‘…तर मी राजकारण सोडेन’ राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यातच अनेक ठिकाणी भाजपनेही मुस्लिमांना उमेदवारी दिलेली असतांना नवनीत राणांनी परत अकोटच्या सभेत ‘बटेंगे तो कटेगे’चा नारा दिलाय. त्यामुळे भाजप नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा ‘बटेंगे तो कटेंगे’ मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न यातून होतोय का?, असा प्रश्न यातून निर्माण झालाय. दरम्यान, याच सभेत नवनीत राणांनी काँग्रेस नेते राहूल गांधींना थेट चॅलेंज’च दिलंय. राहूल गांधींनी संविधानाचं पुस्तक हाती न घेता संविधानातील कलमं सांगून दाखवावी, असं त्या म्हणाल्यात. असं राहूल गांधींनी केलं तर आपण राजकारण सोडू असं आव्हान राणांनी राहूल गांधींना दिलंय. त्यामुळं यावर आता काँग्रेसकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं गरजेचं आहे. ================= ‘भाजपा बाटलेला पक्ष”- कोकाटे ‘भाजपा हा बाटलेला पक्ष आहे, त्यांना फोडाफोडी करण्याशिवाय काहीच येत नाही’, असे विधान राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. सिन्नर नगरपरिषदेच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत असताना त्यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपा पक्षाबद्दल केलेले विधान वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.संपूर्ण राज्यात महायुतीमध्येच आपापसात लढाई सुरू आहे. निवडणुकीत संघर्ष हा युतीमध्येच आहे. विरोधी पक्ष तर कुठेच दिसत नाही. आपल्याकडे थोडासा उबाठा दिसतो. तोही बाटलेला आहे. भाजपा तर पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे. भाजपाचे काहीच राहिलेले नाही. इकडून फोड, तिकडून फोड, फोडाफोडीमध्ये त्यांचे आयुष्य चालले. त्यांचे बिचारे जुने कार्यकर्ते घरी बसले आहेत.” असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, यापूर्वीही अनेकदा कोकाटे यांनी केलेल्या विधानामुळे ते वादग्रस्त ठरले होते. ================= हिंदू महासभा साधुग्राम आंदोलन नाशिकच्या साधुग्रामच्या जागेवरील वृक्षतोडीच्या आंदोलनात आता ठाकरेंची शिवसेना आणि हिंदू महासभेन उडी घेतली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने आज सकाळी झाडे वाचवण्यासाठी आंदोलन केलं तर हिंदू महासभा दुपारी आंदोलन करणार आहे, तपोवनातील झाडांना दोरा बांधून, पूजा करून झाडांच्या रक्षणाची हमी हिंदू महासभेचे माध्यमातून दिली जाणार आहे. आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू महासभा नाशिकच्या राजकारणात शिरकाव करणार आहे, नाशिक महापालिकाच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू महासभा आपले नशीब आजमावणार असून नाशिककरांच्या सर्व प्रश्नांना आणि समस्यांना वाचा फोडणार आहेत. ================= या जागांची निवडणूक लांबणीवर सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी घडामोड समोर आले आहे.. या दोन्ही निवडणुका आता 20 आणि 21 डिसेंबरला होणार. निवडणूक प्रक्रिया लांबीवर पडण्यामागचे न्यायालयीन कारण असल्याचे समोर.जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रिया बाबत याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी घेतला आहे. यापूर्वी देखील काही ठिकाणच्या निवडणुकांना आयोगाने स्थगिती दिली आहे. तर कुठे निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेत. =============== शरद पवार, काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेकडे युतीसाठी जाणार नाही “भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तिघेही सत्तेत एकत्र आहेत. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत मात्र ते आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाने युतीबाबत निर्णय घेतला आणि समाधानकारक जागा मिळाल्या तर आम्ही महायुतीसोबतच राहू. पण जागा समाधानकारक न मिळाल्यास शिवसेना (शिंदे गट) किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी हा आमच्यासाठी पर्याय आहे.” असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या मित्र पक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षासोबत युती न करण्याचा ठाम इशारा दिलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये ते बोलत होते. ==================== सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजपद्धतीत महत्त्वाचे बदल भारताचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजपद्धतीत महत्त्वाचे आणि मोठे बदल केलेत. प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या त्यासोबत सुनावणीतील विलंब कमी करण्यासाठी त्यांनी चार प्रशासकीय आदेश जारी केलेत. हे आदेश उद्यापासून लागू होणार आहेत. या सुधारणांमुळे आता नव्याने दाखल होणाऱ्या जामीन याचिकांवर दोन दिवसांत सुनावणी होईल. एकूणच, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारताच प्रलंबित प्रकरणे कमी करणे आणि व्यक्ती स्वातंत्र्याशी निगडित बाबींना तातडीने न्याय देणे यावर ठोस पावले उचलली आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. ================ बूथ लेव्हल ऑफिसर संदर्भात मोठा निर्णय निवडणूक आयोगानं बूथ लेव्हल ऑफिसर संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. देशातील अनेक राज्यांमध्ये मतदार यादीची एसआयआर म्हणजेच स्पेशल इंन्टेसिव्ह रिव्हिजन सुरु आहे. या दरम्यान निवडणूक आयोगानं बूथ लेव्हल ऑफिसरच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. बीएलओला पहिल्यांदा 6000 रुपये मानधन मिळायचं ते आता 12000 रुपये दिलं जाणार आहे. याशिवाय बीएलओ सुपरवायझरच्या मानधनात देखील वाढ करण्यात आलीय. अगोदर सुपरवायझरला 12000 रुपये मानधन मिळायचं ते आता 18000 रुपये करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. ======================= ….तरीही शरणार्थ्यांना अमेरिकेचे दरवाजे बंद अमेरिकेच्या वॉशिंगटन डीसीमध्ये झालेल्या गोळीबारानंतर अमेरिकन प्रशासनाने त्यंत कठीण निर्णय घेत तिसऱ्या जगातील लोकांना देशात बंदी घातली आहे. दरम्यान, या मोठ्या घडामोडीवर संयुक्त राष्ट्रांच्या अनेक एजन्सींनी वारंवार आवाहन करूनही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ‘तिसऱ्या जगातून’ अमेरिकेत येणाऱ्या लोकांना कायमचे थांबवायचे आहे. असे स्पष्ट मत पुन्हा एकदा ट्रम्प यांनी म्हटलय. सोशल मीडियावर अमेरिकन कायद्याचा उल्लेख करत ट्रम्प यांनी, जर हा कायदा अमेरिकेच्या हितासाठी असेल तर कोणत्याही गटातील किंवा देशातील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो असे त्यांनी म्हटलंय. ======================== तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत विजय मिळवून भारतीय संघाकडे कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचं नेतृत्त्व करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर मायदेशात भारताकडून खेळताना दिसतील. भारताचा माजी क्रिकेटपटू एस. बद्रीनाथनं 15 खेळाडूंपैकी 11 जणांची निवड केली आहे. भारत-दक्षिण आफ्रिकेतील या तीन दिवसीय मालिकेतील पहिला सामना आज रांची मध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना ३ डिसेंबरला रायपूरमध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना विशाखापट्टणममध्ये ६ डिसेंबरला होणार आहे. ====================== रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’चं रिलिज थांबणार? रणवीर सिंहची आगामी फिल्म ‘धुरंधर’ डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एंट्रीसाठी सज्ज आहे. मात्र, रिलीजपूर्वीच ही फिल्म कायदेशीर कचाट्यात सापडल्याचं दिसत आहे. शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबियांनी या चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती देण्याची मागणी केलीय. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. मेजर मोहित शर्मा जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. ‘धुरंधर’ची कथा त्यांच्या शहीद मुलाच्या जीवनावर आधारित असूनही चित्रपट निर्मात्यांनी त्यांची परवानगी घेतली नाही असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दरम्यान, ही फिल्म 5 डिसेंबरला जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.