नाशिकचा तिढा सुटला, पण पुण्यात जागावाटपाचं घोडं अडलं महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली घडत आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलाय. नाशिक आणि पुण्यातील जागावाटप संदर्भात शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक झाली. यात नाशिकमधील तिढा सुटला पण पुण्यातील जागावाटपावर निर्णय होऊ शकला नाही नाहीये. त्या जागांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी सोडवले जाणार आहेत.नाशिक महापालिकेमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहेत. तर शिंदेंची शिवसेना २५ ते ३० जागा लढवणार आहेत. नाशिकच्या जागा वाटपाचा मार्ग मोकळा झाला मात्र पुण्याचा प्रश्न अजून अनुत्तीर्ण आहे. ज्या जागांवर तिढा आहे त्या जागांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार आहे. ज्या जागांवर एकमत नाही त्या जागांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यादी जाहीर केली जाणार आहे. पुण्यात शिवसेनेला ३०-३५ जागा हव्या असल्याची माहिती मिळतेय. ===================== पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकांसाठी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. 26 जिसेंबरला याबाबत निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर करणार आहे. मात्र,. त्यापूर्वीच शरद पवार आणि अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. रविवारी बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून गौतम अदानी हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर शरद पवारांसह सर्व पवार कुटुंब या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे.याच निमित्तानं ही आघाडी जाहीर करण्याची आता केवळ औपचारिकता शिल्लक असून, उपमुख्यमंत्री अजित पवार २६ डिसेंबर रोजी याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. ================= ‘देवराई प्रकल्पाला’ भीषण आग, हजारो झाडं जळून खाक अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराई प्रकल्पातील काही झाडांना आग लागल्याची घटना घडलीय. सयाजी शिंदे यांनी मागील काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील पालवण जवळ देवराई प्रकल्प उभा केला होता. याच ठिकाणी अचानक ही आग लागली आहे. नेमकी आग कशामुळं लागली याबाबतची अद्याप माहिती मिळाली नाही. अग्निशामक आणि वन विभागाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु दरम्यान, यापूर्वी देखील असाच काहीसा प्रकार समोर आला होता. दरम्यान आज पुन्हा एकदा या ठिकाणी आग लागली आहे. अग्निशामक आणि वन विभागाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे डोंगरावरील हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर या आगीमुळे अक्षरशः पाणी फेरलं गेलं आहे. ===================== कृष्णराज महाडिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आता भाजपचे राज्यसभा खासदार धनंज महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक लढवू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधून रिंगणात उतरु शकतात. तसे घडल्यास कोल्हापूरच्या राजकारणात महाडिकांची तिसरी पिढी उतरणार आहे. त्यामुळे आता कोल्हापूरकरांना कृष्णराज महाडिक खरोखरच महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याची उत्सुकता लागली आहे. ===================== मनसे पदाधिकाऱ्यावर काळाचा घाला नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ‘विझलो जरी मी, हा माझा अंत नाही…’ अशी पोस्ट लिहिणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा दुसऱ्याच दिवशी अपघाती मृत्यू झाला. कारंजा शहरातील मनसेचे पदाधिकारी हरिश हेडा यांच्या दुचाकीला एका भरधाव पिक-अप वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हरिश हेडांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हरिश हेडा हे 2008 पासून अविरतपणे मनसे कार्यकर्ता म्हणून काम करत होते. कारंजा नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. त्यानंतर दोनच दिवसात हरिश हेडांचाही मृत्यू झाला. =================== नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण केंद्र सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना उड्डाणाची तयारी सुरू करण्याची परवानगी दिलीय. या निर्णयामुळे भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात प्रवाशांना अधिक पर्याय मिळू शकतील. लवकरच नवीन दोन एअरलाईन्सची विमान सेवा सुरू होणार आहे. विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सध्या अस्तित्त्वात असलेल्या कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचं दिसत आहे. त्याचमुळे केंद्र सरकारने दोन नव्या कंपन्यांना मान्यता दिलीय. अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला या आठवड्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालंय. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी याबाबतची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलीय. ==================== येत्या दोन महिन्यात संपूर्ण देशात टॅक्सी सेवा सुरु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केलीय. हरियाणाच्या पंचकुलामध्ये आयोजित सहकार संमेलनात बोलताना अमित शाह यांनी भारत टॅक्सी सेवा सुरु करण्यासंदर्भात घोषणा केली. सहकारी तत्वावर आधारित अशी भारत टॅक्सीची सेवा असेल. भारत टॅक्सीद्वारे ओला उबर सारख्या खासगी कंपन्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणं आणि टॅक्सी चालकांचं उत्पन्न दुप्पट करणं हे भारत टॅक्सी सेवा सुरु करण्याचं ध्येय आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारत टॅक्सी मॉडेल खासगी सेवा पुरवठादारांपेक्षा वेगळं असेल असं म्हटलं.अमित शाह म्हणाले सध्या ज्या कंपन्या टॅक्सीचं काम करतात त्यात नफा मालकांकडे जातो. मात्र, भारत टॅक्सीची सर्व रक्कम आमच्या चालकांच्या खिशात जाईल. असे आश्वासन देखील त्यांनी दिलंय. ====================== तारिक रहमान यांच्या परतीपूर्वीच ढाक्यात हिंसाचार बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे नेते तारिक रहमान यांच्या परतीच्या अपेक्षेपूर्वीच राजधानी ढाका पुन्हा एकदा हिंसाचाराने वेढली गेली. नाताळच्या पूर्वसंध्येला मोघबाजार परिसरात झालेल्या एका क्रूड बॉम्ब स्फोटात २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे राजधानीच्या सुरक्षिततेवर आणि राजकीय वातावरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी संध्याकाळीअज्ञात हल्लेखोरांनी मोघबाजार फ्लायओव्हरवरून खाली रस्त्यावर एक शक्तिशाली क्रूड बॉम्ब फेकला. बॉम्ब रस्त्यावरून चालत असलेल्या एका तरुणाला लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. स्फोटामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. ==================== क्रिकेटच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड तुटले बिहार संघाने क्रिकेट इतिहासात नवा सुवर्णअध्याय लिहिला आहे. विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात बिहारने 50 षटकांत 6 गडी गमावत तब्बल 574 धावा ठोकल्या. या डावात 3 फलंदाजांनी शतके ठोकली. हा लिस्ट-ए क्रिकेटमधील आजवरचा सर्वोच्च संघ स्कोअर ठरला आहे. रांची येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध बिहारच्या फलंदाजांनी खळबळ उडवून दिली. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने पहिल्या विकेटसाठी 158 धावांची भक्कम भागीदारी रचली. त्याने अवघ्या 84 चेंडूमध्ये 190 धावांची खेळी खेळली. यापूर्वी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तमिळनाडूच्या नावावर होता. 2022 मध्ये तमिळनाडूने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 2 गडी गमावत 506 धावा केल्या होत्या. तब्बल तीन वर्षांनंतर बिहारने हाच संघ पराभूत करत तो विक्रम मोडीत काढला. या यादीत बिहार आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला. ================ अक्षय कुमारची टेलिव्हिजन विश्वात एन्ट्री अॅक्शन हिरो अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. बऱ्याच काळावधीनंतर अक्षय पुन्हा टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करणार आहे. सोनी टिव्हीवरील ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ नावाच्या शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्मात्यांनी या शोचा प्रोमो रिलीज केला आहे. जवळजवळ 60 देशांमध्ये लोकप्रिय असलेला हा रिअॅलिटी शो आता भारतात देखील सुरू होणार आहे.व्हील ऑफ फॉर्च्यून’ हा शो जगातील सर्वात लोकप्रिय गेम शो असल्याचे म्हटले जात आहे. या शोने आतापर्यंत आठ एमी पुरस्कार जिंकले आहेत. हा अमेरिकेतील नंबर वन मनोरंजक शो असून, हा शो 40 देशात हिट आहे. आता लवकरच हा शो भारतात सुरू होणार असून, अक्षय कुमार या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.