India safest bank list | सर्वसामान्य माणूस आपल्या कष्टाने पैसा जमा करून सुरक्षित बँकेत ठेवतो. जेणेकरून गरजेच्या वेळी त्या पैशांचा आधार मिळेल. मात्र अनेकदा बँकच बुडते आणि ठेवीदारांच्या हातात फक्त पश्चाताप उरतो. बऱ्याचदा या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पैसे ठेवण्यापूर्वी त्या बँकेची सुरक्षितता आणि विश्वासार्हता तपासून घेणे फार महत्त्वाचे असते. यातच आता आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या 3 बँकांची माहिती दिली आहे. या बँकेत तुम्ही पैसे ठेवल्यास ते सुरक्षित राहतात. कोणत्या 3 बँका आहेत सुरक्षित? भारतातील सर्वात सुरक्षित बँकांमध्ये एक सरकारी आणि दोन खाजगी बँका आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मते, ज्या बँका बुडण्याची अजिबात शक्यता नाही, त्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank). बँकिंग भाषेत या बँकाना ‘डोमेस्टिक सिस्टिमिकली इम्पॉर्टंट बँक्स’ (D-SIB) म्हणतात. आरबीआयने या तीन बँकांना D-SIB चा दर्जा दिल्याने, या बँकांवर सामान्य बँकांच्या तुलनेत अधिक कडक देखरेख ठेवली जाते. आरबीआयने या बँकांना D-SIB म्हणून घोषित केल्यामुळे, या बँका मोठे आर्थिक धक्के सहन करण्यास सक्षम आहेत आणि तुमच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री मिळते. या बँकांमध्ये जमा केलेला तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित मानला जातो. या बँक का आहेत महत्त्वाच्या ? या बँकांचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे आणि त्यांचे देशाच्या जीडीपीमध्ये मोठे योगदान आहे. यामुळे, जर भविष्यात या बँकांवर कोणतेही मोठे आर्थिक संकट आले, तर भारत सरकार स्वतः पुढे येऊन या बँकांना वाचवेल. या तीन बँका भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्या बुडणार नाहीत किंवा दिवाळखोर होणार नाहीत असं आरबीआयने म्हटलं आहे. कारण या बँका इतक्या मोठ्या आहेत की बँका बुडाल्या तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. या तिन्ही बँकांचे देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. छोटीशी चूक झाली तरीही याचा परिणाम शेअर बाजारापासून सामान्य माणसाच्या खिशावर होऊ शकतो. त्यामुळे आरबीआय आणि भारत सरकारने या भविष्यात या बँकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तर हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमचे पैसे या 3 बँकांमध्ये असतील तर ते पूर्णपणे सुरक्षित असणार आहेत. जास्त रोख राखीव निधी किंवा भांडवल ठेवावे लागते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, या तिन्ही बँकांना इतर बँकांपेक्षा जास्त रोख राखीव निधी किंवा भांडवल जवळ ठेवावे लागते. याला ‘कॉमन इक्विटी टियर 1’ (CET 1) असे म्हणतात. हा आपत्कालीन निधी आहे जो संकटाच्या वेळी वापरता येतो. त्यामुळे या बँकांच्या कामकाजावर परिणाम होत नाही किंवा नागरिकांच्या पैशांवर गदा येत नाही. त्यामुळे या बँकांमध्ये पैसे असणे सर्वात सुरक्षित मानले जाते. India safest bank list | दरम्यान, RBI ने पहिल्यांदा देशांतर्गत व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या बँकांची यादी तयार करण्याची संकल्पना २०१४ मध्ये मांडली होती. त्यानुसार २०१५ मध्ये SBI ला, २०१६ मध्ये ICICI बँकेला आणि २०१७ मध्ये HDFC बँकेला या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. India safest bank list | हेही वाचा: Pune District : जेजुरीचा नगराध्यक्ष कोण होणार? राष्ट्रवादी- भाजपमध्ये ६ प्रभागांत चुरस : बाहेरगावचे मतदारांचा प्रभाव