Sanjay Raut : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज १७ मार्च रोजी एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. शिंदे अचानाक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनके तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. अशातच त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. “आपापासातल्या वादाची, देण्याघेण्याची, विकासाची चर्चा करण्यासाठी दिल्लीत यावं लागतं. बाळासाहेबांची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे निर्णय मुंबईतून होतात. पण अमित शाह यांनी स्थापन केलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांना दिल्लीत येऊनच हायकमांडशी चर्चा करावी लागते”. अशा शब्दांत राऊतांनी शिंदेंना चिमटा काढला आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? Sanjay Raut “तिघांचेही हायकमांड दिल्लीत आहे. नावं वेगळी असलील तरी हायकमांड दिल्लीत असल्याने महाराष्ट्रातील घडामोडींची, आपापासातल्या वादाची, देण्याघेण्याची, विकासाची चर्चा करण्यासाठी दिल्लीत यावं लागतं. बाळासाहेबांची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे निर्णय मुंबईतून होतात. पण अमित शाह यांनी स्थापन केलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांना दिल्लीत येऊनच हायकमांडशी चर्चा करावी लागते.” असे संजय राऊत म्हणाले. हेही वाचा : ORS Drink: उन्हाळ्यात जीव वाचवणारा उपाय! घरच्या घरी ORS बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या अमित शाह देशाचे गृहमंत्री, सहकार मंत्री आहेत. राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांना त्यांना, देशाच्या पंतप्रधानांना कोणी भेटत असेल तर आक्षेप घेण्यासारखं काही नाही. अमित शाह, नरेंद्र मोदी हे दोघेही शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निर्माते, संस्थापक आहेत त्यामुळे त्यांना भेटणं आवश्यक असतं, असे देखील राऊत म्हणाले. Eknath Shinde and Sanjay Raut या दौऱ्यात जागावाटप आणि मित्रपक्षांमधील समन्वय तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणे, हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे बोलले जात आहे. तीन निवडणुकांमध्ये मित्रपक्षाकडून विविध ठिकाणी न मिळालेले सहकार्य त्यामुळे पक्षाचे अनेक उमेदवार पराभूत झाले. याचा अहवाल एकनाथ शिंदे अमित शाह, नरेंद्र मोदींकडे देणार असल्याची चर्चा होती. यावर देखील शिदेंना राऊतांनी कोपरखेळी लगावली आहे. “दिल्लीत येऊन कितीही अहवाल दिले तरी काही फरक पडणार नाही. कारण दिल्लीचं नेतृत्व भाजपाचं आहे. ते शिंदेसना आणि अजित पवारांचं नेतृत्व नाही. गरज म्हणून तिथं तुम्हाला ठेवलं आहे. गरज संपली त्यादिवशी मोडीत काढतील”. हेही वाचा : pakistan airstrike in kabul : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक ; ४०० जण ठार, अफगाणिस्तानमध्ये संतापाची लाट