RAHUL GANDHI in LOK SABHA। निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान लोकसभेत अचानक वातावरण गरम झाल्याचे काल पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी संस्थात्मक स्वातंत्र्य आणि बाह्य प्रभावांचा मुद्दा उपस्थित करत असताना सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना अडवले. दोघांमधील जोरदार वादामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. यावेळी सभापती आणि राहुल गांधी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांनी आपल्या निवेदनात, देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे” असे म्हटले आहे. त्यांच्या मते, “विद्यापीठातील कुलगुरूंची नियुक्ती गुणवत्तेपेक्षा विचारसरणीच्या आधारे केली जात आहे, ही परिस्थिती लोकशाहीसाठी चिंताजनक आहे.” राहुल यांनी असाही दावा केला की,” सरकारी संरचनांचा गैरवापर निवडणूक फायद्यासाठी केला जात आहे.” ओम बिर्ला यांचा कडक इशारा राहुल गांधींच्या टिप्पणीनंतर लगेचच लोकसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप केला. ओम बिर्ला यांनी,”चर्चा केवळ निवडणूक सुधारणांवर केंद्रित होती आणि कोणत्याही संघटनेवर किंवा विचारसरणीवर भाष्य करणे हे विषयापासून विचलन होते” असे म्हटले. तसेच बिर्ला यांनी राहुल गांधींना स्पष्ट इशारा दिला की, “आसनाला आव्हान देणे अयोग्य आहे आणि भाषण मुख्य मुद्द्यापुरते मर्यादित राहिले पाहिजे.” सत्ताधारी पक्षाची नाराजी RAHUL GANDHI in LOK SABHA। राहुल गांधी यांनी आपले विधान सुरू करताच, अनेक भाजप खासदारांनी आक्षेप घेतला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी अनावश्यक भाष्य करून सभागृहाचा वेळ वाया घालवला जात असल्याची टिप्पणी केली. निवडणूक सुधारणांऐवजी संघटनांना चर्चेत ओढले जात आहे आणि ही वृत्ती चर्चेला विचलित करत आहे. सततच्या व्यत्ययामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. “माझा आवाज दाबला जात आहे” वारंवार होणाऱ्या व्यत्ययांबाबत नाराजी व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांना जाणूनबुजून व्यत्यय आणला जात आहे. त्यांनी यावेळी मी निघून जाऊ का ? असा सवाल केला. तसेच त्यांनी सांगितले की, त्यांना निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर आणि लोकशाही संस्थांच्या स्थितीवर बोलायचे होते, परंतु सत्ताधारी पक्ष त्यांना सतत व्यत्यय आणत होता. राहुल यांनी असेही म्हटले की “महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करू दिले जात नाहीत.” असेही त्यांनी यावेळी म्हटले. निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न RAHUL GANDHI in LOK SABHA। विषयाकडे परतताना, राहुल गांधी म्हणाले की, लोक निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर संशय घेत आहेत. त्यांचा असा विश्वास होता की निर्णय घेण्याची प्रक्रिया पारदर्शक राहिली नाही. नियुक्त्यांमध्ये निष्पक्षता कमकुवत झाली आहे आणि लोकशाही रचनेवर दबाव आहे. संस्थात्मक रचनेला कमकुवत करण्याची ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे, असा दावाही राहुल यांनी केला.