putin modi bilateral talks। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी हैदराबाद हाऊसमध्ये पुतिन यांचे स्वागत केले. द्विपक्षीय बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती पुतिन यांचे भारत भेटीबद्दल आभार मानले. त्यासोबतच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी युक्रेन संघर्षावर भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी, भारत तटस्थ नसून जागतिक शांततेच्या बाजूने असल्याचे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. “जगात लवकरच शांतता पसरेल ” अशी आशा देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केली. आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांनी, “महामहिम, तुमची भेट खरोखरच ऐतिहासिक आहे. २००१ मध्ये, जेव्हा तुम्ही पदभार स्वीकारला तेव्हा तुम्ही पहिल्यांदाच भारताला भेट दिली. त्या पहिल्या भेटीने भारत आणि रशियामधील मजबूत धोरणात्मक संबंधांचा पाया रचला. तुमच्याशी असलेल्या माझ्या नात्याला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत याचा मला वैयक्तिकरित्या सन्मान आहे.” पुढे भारत-रशिया संबंधांवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, “२००१ मध्ये तुम्ही बजावलेली भूमिका ही एक दूरदर्शी नेता कसा विचार करतो आणि संबंध किती दूर जाऊ शकतात याचे एक उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते.” असे म्हणाले. युक्रेन संकटाबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले? putin modi bilateral talks। युक्रेन संकटावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. याविषयी बोलताना त्यांनी, “युक्रेन संकटापासून आपण परिस्थितीवर चर्चा करत आहोत आणि एक खरा मित्र म्हणून, तुम्ही मला सर्वकाही माहिती दिली आहे. तसेच मी समजतो कि विश्वास ही एक शक्तिशाली शक्ती आहे आणि मी या मुद्द्यावर माझी बाजू देखील मांडली आहे. जगाच्या कल्याणासाठी, आपण सर्वांनी शांततेचा मार्ग शोधण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की जग शांततेकडे परत येईल.”असे मत मोदींनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी पुढे यांनी, “मी जेव्हा जेव्हा जागतिक नेत्यांशी अलिकडे बोललो तेव्हा मी म्हटले की भारत तटस्थ नाही; भारत शांतीचा समर्थक आहे. शांतीसाठी केलेल्या सर्व प्रयत्नांमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत. जगाने कोविडपासून आतापर्यंत अनेक संकटे पाहिली आहेत. मला आशा आहे की जग प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल. मला विश्वास आहे की आज आपण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करू ज्यामुळे आपल्या दोन्ही देशांमधील संबंध वाढतील आणि त्यांना नवीन उंचीवर नेतील.” असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनंतर, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्या भाषणात, आम्ही या मुद्द्यांवर चर्चा केली आणि रशिया देखील शांततेला पाठिंबा देतो. त्यांनी,”पंतप्रधान मोदींना सांगितले की युक्रेन संघर्षावर चर्चा सुरू आहे आणि ते त्यांना याबद्दल अपडेट देतील.”असेही म्हटले. putin modi bilateral talks।