Pune News : उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. मात्र असे असतानाच पुणे महानगरपालिकाने घेतलेल्या अजब निर्णयाची चांगलीच चर्चा झाली. 15 तारखेला पुणे (Pune) महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. मात्र यावरून टीका झाल्यानंतर पुणे महापालिकेचा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याबाबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून याची दखल घेतली गेली आणि त्यानंतर अजित पवार यांच्या दु:खद घटनेमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. Rajpal Yadav : ‘चेक बाऊन्स’ प्रकरण भोवलं; कोर्टाने फटकारल्यानंतर राजपाल यादवचे आत्मसमर्पण पुणे महानगरपालिकेने आगामी पुणे महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच-गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे अजित पवार ज्या पुण्याचे पालकमंत्री होते, त्याच पुणे महानगरपालिकेने असा निर्णय घेतल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. Pune News Pmc दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर विमान लँडिंग दरम्यान सकाळी 8.46 वाजता विमानाचा अपघात होऊन मोठा स्फोट झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. Pune News हेही वाचा: Pune Bar Association : पुणे बार असोसिएशनच्या खजिनदारपदी ॲड. अंजली बांदल यांचा विजय