या विचित्र वादानंतरही सामना सुरू राहिला. लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ६ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला. फखर झमानने ३९ चेंडूत ५३ धावांची धडाकेबाज खेळी केली. प्रत्युत्तरात हैदराबाद किंग्समेनचा संघ २० ओव्हरमध्ये केवळ १३० धावाच करू शकला. परिणामी, लाहोर कलंदर्सने ६९ धावांनी मोठा विजय मिळवत स्पर्धेत विजयी श्रीगणेशा केला.
\nपाकिस्तानमधील इंधन संकट आणि रिकाम्या स्टेडियमनंतर आता निकृष्ट दर्जाच्या जर्सीमुळे चेंडूचा रंग बदलल्याने पीसीबीवर सोशल मीडियाच्या माध्यामातून जोरदार टीका होत आहे.