President Nicolas Maduro। अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईनंतर, राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना न्यूयॉर्कमधील एका संघीय न्यायालयात हजर करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेत खटला चालवला जाईल आणि ते व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना सर्वात कठोर शिक्षा मिळावी याची खात्री करतील. या विधानानंतर, मादुरो यांना न्यू यॉर्कच्या न्यायालयात हजर करण्यात आले, यावेळी त्यांनी मी अजूनही राष्ट्रपती आहे असं म्हणत न्यायालयात गर्जना केली. त्यांच्या या गर्जनेमुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा तणाव निर्माण झाला आहे. निकोलस मादुरो यांना बेड्या President Nicolas Maduro। स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस नारंगी तुरुंगाच्या गणवेशात आणि बेड्यांमध्ये न्यायालयात हजर झाले, ज्याठिकाणी दोघांनीही अमेरिकेने लावलेले सर्व ड्रग्ज आणि नार्को-दहशतवादाचे आरोप स्पष्टपणे नाकारले. शिवाय, मादुरो यांनी न्यायाधीशांसमोर स्वतःचे वर्णन राजकीयदृष्ट्या छळ झालेला व्यक्ती म्हणून केले आणि अमेरिका त्यांच्या सार्वभौमत्वावर हल्ला करत असल्याचे म्हटले. पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होईल मादुरोच्या वकिलांनी असेही स्पष्ट केले की, ते सध्या जामीन मागत नाहीत, तर पुराव्यांवर आधारित पारदर्शक न्यायालयीन सुनावणीची अपेक्षा करतात. प्रदीर्घ चर्चेनंतर, न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख १७ मार्च २०२६ निश्चित केली. तोपर्यंत, मादुरो आणि त्यांची पत्नी अमेरिकेच्या तुरुंगात राहतील. मादुरो यांना जन्मठेपेची शिक्षा होईल का? President Nicolas Maduro। अमेरिकन न्याय विभागाच्या मते, जर मादुरो दोषी आढळले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. ऑपरेशन अॅब्सोल्युट रिझोल्वचा भाग म्हणून अमेरिकन सैन्याने ३ जानेवारी रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे मादुरो यांना ताब्यात घेतले. अमेरिकेचा दावा आहे की मादुरो आणि त्यांचे जवळचे सहकारी कोलंबियन बंडखोर गटांशी संगनमत करून बेकायदेशीर कोकेन तस्करीत बराच काळ सहभागी आहेत, त्यातून मिळणारे पैसे शस्त्रे पुरवण्यासाठी आणि राजकीय नेटवर्क मजबूत करण्यासाठी वापरत आहेत.