PM Modi Rahul Gandhi Meet: केरळ, बंगाल आणि आसामसह पाच राज्यांमधील निवडणुकीच्या लढाईमुळे राजकीय वातावरण तापत आहे. आज भारतीय राजकारणाचा एक विशेष अनोखा पैलू समोर आला आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची अचानक समोरासमोर भेट झाली आणि हीच भेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आज झालेल्या भेटीदरम्यान राहुल गांधींनी हात जोडून पंतप्रधानांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनीही हात जोडून त्यांच्या स्वागताला प्रतिसाद दिला. इतकेच नाही, तर त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ संवाद झाला. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हात जोडून स्वागत, त्यानंतर दीर्घ संवाद PM Modi Rahul Gandhi Meet पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील या भेटीमागे आज महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती निमित्त ठरली आहे. संसद परिसरातील प्रेरणा स्थळ याठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार, तसेच लोकसभा अध्यक्षांसह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची याच कार्यक्रमात भेट झाली. PM Modi Rahul Gandhi Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी संसद परिसरातील ‘प्रेरणा स्थळ’ याठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभेचे माजी उपसभापती हरिवंश आणि इतर राजकीय नेतेही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी ज्योतिबा फुले यांना वाहिली आदरांजली PM Modi Rahul Gandhi Meet पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रख्यात समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना म्हटले की, त्यांचे जीवन समानता, न्याय आणि शिक्षण या आदर्शांना समर्पित होते. फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी महाराष्ट्रात झाला आणि २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे निधन झाले. या प्रसंगी पंतप्रधान काय म्हणाले? (PM Modi Rahul Gandhi Meet) पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये , “महान समाजसुधारक महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती सोहळ्याला सुरुवात होत आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण, ज्ञान आणि लोककल्याणासाठी समर्पित केले “असे म्हटले आहे. ते महिला आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे अग्रणी होते. त्यांचे विचार सर्वांना सामाजिक प्रगतीच्या दिशेने मार्गदर्शन करत राहोत.” त्यांनी पुढे म्हटले की, फुले यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण हे सक्षमीकरणाचे एक शक्तिशाली साधन बनले. पंतप्रधान – राहुल गांधी यांच्यात काय चर्चा झाली? पंतप्रधान मोदी संसद परिसरात पोहोचताच, राहुल गांधी आणि जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांनी हात जोडून त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनीही हात जोडून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यानंतर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. प्रश्न असा आहे की, सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली हे अस्पष्ट आहे. मात्र, त्यांच्या संभाषणाच्या व्हिडिओवरून असे दिसते की, दोन्ही नेते अत्यंत गंभीर चर्चेत गुंतले होते.