पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला परजीवी पक्ष म्हटले. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर महाआघाडीत आपला दीर्घकाळचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुकचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. कर्नाटकातील बंगळूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी,”आज काँग्रेसची ओळख एक परजीवी पक्ष म्हणून झाली आहे आणि म्हणूनच संधी मिळताच तो आपल्या मित्रपक्षांनाही दगा देतो. तामिळनाडूकडेच बघा.”
\nडीएमकेमुळे यूपीए सरकार अनेकदा टिकले PM Modi:
\nपंतप्रधान मोदींनी काँग्रेसला परजीवी पक्ष संबोधत त्यावर टीका केली. ते म्हणाले की, २५-३० वर्षे काँग्रेस आणि डीएमकेचे जवळचे संबंध होते. डीएमकेसोबतच्या युतीने काँग्रेसला अनेक वेळा संकटातून वाचवले आणि २०१४ पूर्वी १० वर्षे सत्तेवर असलेले यूपीए सरकारसुद्धा डीएमकेमुळेच टिकले.
काँग्रेसला सत्तेची भूक PM Modi:
\nकाँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, डीएमके २५-३० वर्षे काँग्रेसच्या सुख-दुःखात सोबत उभी राहिली. प्रत्येक क्षणी ते काँग्रेसच्या हिताचेच होते, पण इतरत्र राजकीय समीकरणे बदलताच, सत्तालोभी काँग्रेसने पहिल्याच संधीत डीएमकेला दगा दिला.