पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी?
\n
\nपंतप्रधानांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या अर्ध्या तासाच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या राजकीय प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. भाजप नेतृत्वाने पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे, अशा चर्चा रंगत आहेत. तूर्तास सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या जागेवर पार्थ पवार यांना घेतले जाईल, अशी रणनीती ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम –
\n
\nगेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (अजित पवार आणि शरद पवार गट) पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, दिल्लीतील या हाय-व्होल्टेज बैठकांनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आपली स्वतंत्र ओळख टिकवून भाजपसोबतची युती अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहे.
सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार?
\n
\nअजित पवार यांच्या जाण्याने पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या महिनाभरात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’पदी अधिकृत निवड होण्याची दाट शक्यता आहे. या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व अधिक प्रबळ होताना दिसत आहे.