Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेतून महाराष्ट्रातील सात खासदार निवृत्त होत आहेत. त्यामुळे या रिक्त जागांसाठी १६ मार्चला मतदान होणार आहे. अशातच राज्यसभेवर उमेदवारी मिळण्याअगोदरच उमेदवारीवरून आघाडीत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. निवृत्त होणाऱ्या सात खासदारांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील आहेत. तेच पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा रंगली असतानाच शिवसेना उबाठा आणि काँग्रेस पक्षाने देखील राज्यसभेच्या जागेवर दावा केला आहे. शिवसेना उबाठाकडून हे नेते इच्छुक प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे हे नेते राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. मविआच्या बैठकीला उबाठा नेत्यांची दांडी येत्या काही दिवसांवर राज्यसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपकडून चार जागेसाठी नेत्यांची नावाची यादी तयार करण्यात आली असून, पक्षनेतृत्वाकडून उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे राज्यसभेच्या एका जागेवरून मविआत रस्सीखेच सुरू आहे. आदित्य ठाकरे यांना दोन वेळा राज्यसभेच्या बैठकीला बोलावण्यात आलं होतं, मात्र आदित्य ठाकरे बैठकीला गेले नाहीत. राज्यसभेची एक जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांनी देखील बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे राज्यसभेची एक जागा कोणत्या पक्षाच्या पराड्यात पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रातून कोण निवृत्त होणार? महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. या खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील मोहन पाटील यांचा समावेश आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान या नावांचा समावेश आहे. अशा होतात राज्यसभेच्या निवडणुका राज्यसभेच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. राज्यसभेचे सदस्य राज्यांच्या विधानसभांमधील आमदार निवडतात. राज्यसभेत एकूण २४५ सदस्य असतात. त्यापैकी २३३ सदस्य राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशांमधून निवडले जातात, तर १२ सदस्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी सुमारे एक-तृतीयांश सदस्य निवृत्त होतात. हेही वाचा : Khawaja Asif on India: ‘ आता संयम संपलाय कारवाई करा, भारत…’ ; अफगाणिस्तानशी युद्धादरम्यान ख्वाजा आसिफ यांची भारताला धमकी