NCP Merger: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेला पेचप्रसंग केवळ सत्ताधारी आणि विरोधकांपुरता मर्यादित न राहता, आता तो सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत संघर्षापर्यंत पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला असून, यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने घेतलेली भूमिका भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ज्या मुद्द्यावर भाजप नेते आणि अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना खोटे ठरवत आहेत, त्याच मुद्द्यावर शिंदे गटाचे नेते मात्र शरद पवारांच्या सुरात सूर मिसळताना दिसत आहेत. विलिनीकरणाचा दावा आणि भाजपचा आक्षेप – अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी एक विधान केले होते. १२ फेब्रुवारी ही तारीख दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासाठी निश्चित करण्यात आली होती आणि त्याबाबत अजित पवारांशी सविस्तर चर्चा झाली होती, असा दावा शरद पवारांनी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. भाजपसाठी हा दावा धक्कादायक होता, कारण जर विलिनीकरण होणार होते, तर महायुतीचे भवितव्य काय? या भीतीने भाजप नेत्यांनी तत्काळ हा दावा फेटाळून लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या थिअरीवर शंका उपस्थित केली. “अजित पवार असा कोणताही निर्णय भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय घेऊच शकले नसते,” असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, शरद पवारांनीही त्यांना प्रत्युत्तर देताना म्हंटले की, “जे या चर्चेत सहभागीच नव्हते, त्यांना विलिनीकरणाबद्दल भाष्य करण्याचा अधिकार काय?” Todays Top 10 News: अजितदादांच्या अपघाताबाबत आमदार मिटकरींचा नवा खळबळजनक दावा ते सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी… वाचा टाॅप बातम्या शिंदे गटाचा ‘वेगळा सूर’ : शरद पवारांची बाजू – महायुतीचा मित्रपक्ष म्हणून शिवसेनेने (शिंदे गट) भाजपच्या भूमिकेला पाठिंबा देणे अपेक्षित होते. मात्र, प्रताप सरनाईक, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रताप सरनाईक यांनी उघडपणे मान्य केले की, “दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबतची कुजबूज आमच्याही कानावर होती. शरद पवार आता जे सांगत आहेत, त्यात तथ्य असावे.” सरनाईकांचे हे विधान थेट भाजपच्या भूमिकेला छेद देणारे ठरले आहे. भाजप जिथे पवारांना ‘राजकीय खेळी’ म्हणून नाकारत आहे, तिथे शिंदे गटाचे आमदार पवारांच्या विधानात तथ्य शोधत आहेत. शपथविधीच्या टायमिंगवरून शंका – अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घाईघाईने घेतलेल्या निर्णयावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ‘राज्याची गरज’ आणि ‘कर्तव्य’ असल्याचे सांगून सारवासारव केली असली, तरी शिंदे गटाच्या नेत्यांना हे रुचलेले दिसत नाही. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. “सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहेच, पण हा शपथविधी एवढ्या घाईघाईत का झाला, याबद्दल मनात शंका निर्माण होते. सोशल मीडियावरील लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर हे स्पष्ट होते की, हे पाऊल अनेकांना पटलेले नाही,” असे मत सामंत यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे, संजय शिरसाट यांनी टीका केली. “अजितदादांच्या निधनानंतर इतक्या लवकर अशा घडामोडी घडतील असे वाटले नव्हते. हे सर्व पाहून ‘माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे’ असेच वाटते. या प्रक्रियेत शरद पवारांना कदाचित विश्वासात घेतले गेले नसावे,” असे विधान करून शिरसाट यांनी अजित पवार गटाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. Aadhaar Card Cancelled: UIDAI ने 2.5 कोटी आधार कार्ड केले कायमचे बंद महायुतीमधील अस्वस्थतेचे मूळ – शिंदे गटाच्या या भूमिकेमागे राजकीय अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. भाजप आणि शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असतानाही अजित पवारांना सरकारमध्ये सामील करून घेण्यात आले होते. यामुळे सत्तेतील वाटा विभागला गेल्याने शिंदे गटातील अनेक आमदार आधीच नाराज होते. आता अजित पवारांच्या निधनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत, शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) वर दबाव वाढवण्याची ही संधी वाटते आहे. भविष्यातील परिणाम – प्रफुल्ल पटेल आजही विलिनीकरणाचा मुद्दा अजेंड्यावर नसल्याचे सांगत असले, तरी शिंदे गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची बाजू उचलून धरल्यामुळे महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपसाठी ही स्थिती आव्हानात्मक आहे, कारण मित्रपक्षच जर विरोधकांच्या दाव्याला दुजोरा देऊ लागले, तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात विलिनीकरणाची चर्चा पूर्णविराम घेते की महायुतीमधील दरी अधिक रुंदावते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी ‘शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप आणि अजित पवार गट’ असा छुपा सामना रंगताना दिसत आहे. सॅमसनचा पत्ता कट? इशानच्या तुफानी खेळीने वर्ल्ड कपचं गणित बदललं; नॉर्खियाला एकाच ओव्हरमध्ये धो-धो धुतलं