Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच गोष्टी घडत आहेत. महापालिका निवडणुका झाल्यानंतर महापौर पद, विविध समित्यांवर पक्षांकडून दावा केला जात असून, सत्तेसाठी युती आघाडी केली जात आहे. या सगळ्यात आता एक जुने प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या खासदारकीबाबत एक धक्कादायक विधान केले होते. या विधानाप्रकरणी संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याविरोधात न्यायालयात मानहाणीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात आपली साक्ष नोंदवली आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. Sanjay Raut कोकणातील राजकारणात दबदबा असलेले नेते नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. आता जे प्रकरण समोर आले आहे. ते जानेवारी २०२३ मधील आहे. भांडुप येथील कोकण महोत्सवात संजय राऊत यांच्या खासदारकीबाबत नाराणय राणे यांनी एक धक्कादायक विधान केले होते. नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे? “मी संजय राऊत यांना खासदार केले. बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावून राऊत यांना राज्यसभेवर पाठवायचे असल्याचे सांगितले होते, त्यानुसार मी कामाला लागलो.” असे नारायण राणे म्हणाले होते. संजय राऊत यांचे नाव मतदार यादीत नव्हते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता, मात्र मी मध्यस्थी करून त्यांना निवडून आणले. इतकेच नाही तर त्यांना खासदार करण्यासाठी मी पैसे खर्च केले, असे धक्कादायक विधान नारायण राणे यांनी केले होते. २० फेब्रुवारीला नोंदविली साक्ष या विधानानंतर संजय राऊत यांनी आपेक्ष घेतला होता. संजय राऊत म्हणाले, “एकेकाळी मी शिवसेना चालवत होतो, हे त्यांना दाखवायचे होते. माझ्यासारख्या नेता आणि राज्यसभा खासदाराची बदनामी केल्याने व लोकांची राज्य घटनेवरील विश्वास उडला. म्हणून मी हा खटला दाखल केला. दरम्यान, नारायण राणे यांनी केलेल्या मानहानी प्रकरणी संजय राऊत यांनी न्यायालयात आपले मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेले मूळ प्रमाणपत्र दाखल केले. नारायण राणे यांनी केलेल्या भाषणाच्या वृत्तमाध्यमांमध्ये दाखवण्यात आलेल्या बातम्याही संजय राऊत यांनी न्यायालयात सादर केल्या आहेत. काल 20 फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात संजय राऊत यांची साक्ष नोंदवण्यात आली. हेही वाचा : Priyanka Chopra: “बॉलीवूड सोडायचं नव्हतं, पण थांबवल्यासारखं वाटलं…” प्रियांका चोप्राचं स्पष्ट वक्तव्य