Nagarparishad-Nagarpanchayat Election Result। राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा फैसला आज होणार आहे. मतदारांचा अंतिम कौल आज मतमोजणीनंतर समोर येणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वी नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सेमीफायनल कोण जिंकणार राज्याचे लक्ष लागले आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. तर दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात 12 नगर पंचायत व 15 नगरपरिषद मध्ये आज मत मोजणी होणार आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व काँग्रेसकडून सुनील केदार, तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. Nagarparishad-Nagarpanchayat Election Result। ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक बोलले जात असले तरी या निवडणुकांच्या आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. कारण याठिकाणी निवडणुकांच्या धामधुमीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील लहान शहरांचा कौल कोणाला याचा फैसला आज होणार असून कोण गुलाल उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.