Mumbai-Pune Expressway: मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेवर टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल 32 तासांनंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक संथ गतीने सुरू झाली. मात्र आता बोरघाटात अनेक वाहने बंद पडल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळी ५.३०-६.०० वाजता पुण्यातून निघालेली वाहने ८.३० वाजेपर्यंत लोणावळापर्यंतही पोहोचू शकली नव्हती. त्यामुळे आज पुन्हा या मार्गावरील नियोजनाचा अभाव उघड झाला आहे. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरच्या झालेल्या अपघातामुळे अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर टँकरमधील वायू गळती रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याने तब्बल अडीच दिवस वाहतूक ठप्प झाली. यामध्ये अडकलेल्या प्रवाशांना अन्न-पाण्यापासून ते शौचालयाच्या समस्यांना सामोरे जावे लागले. द्रुतगती मार्गावर आपत्कालीन यंत्रणाच सक्षम नसल्याची बाब आता अधोरेखित झाली आहे. mumbai pune highway मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून दखल मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत. Aishwarya Rai & Abhishek Bachchan: ‘Baby पप्पा…’ अभिषेक बच्चनचा ५० वा वाढदिवस; ऐश्वर्या रायची खास पोस्ट व्हायरल मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेतली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिली आहे. सोबतच मिसिंग लिंकचे कामही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. Mumbai-Pune Expressway मात्र या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर आता तरी ठोस निर्णय घेतला जाणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. Mumbai-Pune Expressway: हेही वाचा : Stock Market: रेपो रेट निर्णयापूर्वी शेअर बाजाराची घसरण ; सेन्सेक्स १५५ अंकांनी घसरला, निफ्टीही लाल रंगात