Bomb Threat Vidhan Bhavan : विधिमंडळ बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा मेल आज सकाळी आल्याने विधिमंडळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मेलनंतर पोलिसांनी तात्काळ विधानसभा परिसरात सर्च अॅापरेशन सुरु केले आहे. पोलिसांनी विधानभवन परिसरात कर्मचाऱ्यांना ओळखपत्राची तपासणी केल्यानंतर सोडले आहे. मात्र, या धमकीच्या मेलची राज्यभरात चर्चा होत आहे. बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने सर्व सखोल तपास सुरू केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मेलमध्ये मुंबईतील आणखी चार ठिकाणी बॅाम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सभापती राम शिंदेंनी दिली महत्वाची माहिती (Bomb Threat Vidhan Bhavan) यानंतर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रतिक्रिया देत या धमकीच्या मेलबाबत महत्वाची माहिती दिली आहे. “आज सकाळी सीपीएच्या मेलवर धमकी आली. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे बॉम्ब आणि मिसाईलची धमकी होती. बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने सर्व सखोल तपास सुरू केली आहे. आणखीन चार ठिकाणी धमकी दिली आहे, पोलिसांनी आवश्यक ती दखल घेतली आहे, असे राम शिंदे म्हणाले आहेत. शेअर बाजार, उच्च न्यायालय, मेट्रो आणि बँक उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. आज सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी धमकीचा मेल आला होता, असे देखील राम शिंदे म्हणाले आहेत. Vidhan Bhavan यानंतर उबाठा गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तपास करून अधिवेशनाचा कालावधी एक दिवस वाढवावा अशी विनंती केली आहे, तर आमदार रोहित पवार यांनी सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. काय म्हणाले मिलिंद नार्वेकर? (Bomb Threat Vidhan Bhavan) विधानभवनातील बॉम्ब धमकीच्या पार्श्वभूमीवर आजचे कामकाज स्थगित करून संपूर्ण वास्तूची कसून तपासणी करावी. पोलीस यंत्रणेवरील ताण लक्षात घेता, अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढवावा, ही नम्र विनंती! रोहित पवारांची सखोल तपास करण्याची मागणी तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालवू नका, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. फक्त भिती दाखवण्यासाठी धमकी दिली की या मागे काही आहे हे तपासलं पाहिजे. एकीकडे फारूक अब्दूल्ला यांना मारण्याचा कट होतोय तर दुसरीकडे महाराष्ट्रात बॉम्बची धमकी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला पाहिजे, असंही रोहित पवारांनी सांगितले. हेही वाचा : Share Market Today: शेअर बाजारात मोठा गोंधळ! सेन्सेक्स ८७३ अंकांची तर निफ्टीत २५४ अंकांची घसरण