Amol Mitkari : राज्यात सध्या नाशिकमधील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे संतापाची लाट आहे. या प्रकरणाचे राजकीय वर्तुळात देखील पडसाद उमटल्याचे समोर आले आहे. या सगळ्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ एका कथित व्हायरल व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहेत. नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषदेत केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कारकूनाने 35 हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे ते पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवरुन ट्वीट करत भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असे लक्षात येताच सहा सात महिन्यापूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवळ साहेबांचा व्हीडीओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला? असा सवाल विचारला आहे. नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी ? भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असे लक्षात येताच सहा सात महिन्यापूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवळ साहेबांचा व्हीडीओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला? राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब! त्यानंतर त्यांच्या ऑफिस मध्ये ACB चा ट्रॅप लावणे व नंतर आता हा व्हीडीओ सात महिन्यापूर्वी काढून मिडियाला सोपवणे!! एका सरळ माणसाला बदनाम करायचं नंतर मीडिया ट्रायल..हे झारीतील शुक्राचार्य कोण??अशोक खरात प्रकरण अंगलट येतय म्हणुंन स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येतय ! सोमवती अमावस्या ते अघोरी पुजा ह्या मागे २ सप्टेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असे लक्षात येताच सहा सात महिन्यापूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवळ साहेबांचा व्हीडीओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला?राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही… — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 26, 2026 कथित व्हिडिओत काय आहे? नरहरी झिरवाळ आणि एका तृतीय पंथी व्यक्तीचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सात महिन्यांपूर्वीचा आहे. या व्हिडीओमध्ये शासकीय निवासस्थानी संबंधित तृतीयपंथी आणि मंत्री नरहरी झिरवाळ हे दोघे बेडवर असून त्यांच्याजवळ दारू आणि खाद्यपदार्थ आहेत. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. या कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे.’ असे म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी पोस्टमध्ये केली आहे. हेही वाचा : राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याच्या राजीनाम्याची मागणी; तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल