त्यानंतर रहाणेने अंगक्रिश रघुवंशीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३६ धावा जोडून संघाची धावसंख्या १४५ पर्यंत पोहोचवली. रहाणे तिसऱ्या विकेटच्या रुपाने बाद झाला, त्याने ४० चेंडूंमध्ये पाच षटकार आणि तीन चौकारांसह शानदार ६७ धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर, रघुवंशी आणि रिंकू सिंग यांनी डाव सावरला आणि ३० चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी ६० धावा जोडून संघाची धावसंख्या २०५ पर्यंत पोहोचवली. या धावसंख्येवर रघुवंशी चौथ्या विकेटसाठी बाद झाला. त्याने २९ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि सहा चौकारांसह ५१ धावा केल्या होत्या. रिंकू सिंग चार चौकारांसह २१ चेंडूंमध्ये ३३ धावांवर नाबाद राहिला, तर रमणदीप सिंग चार धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
\n\n\n\n5⃣0⃣ for Ryan Rickelton 👌
\n
\n1⃣0⃣0⃣-run opening stand sealed 🤝@mipaltan cruising in the run chase at 110/0 after 9 overs! 💪Updates ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#TATAIPL | #KhelBindaas | #MIvKKR pic.twitter.com/4GybcAdbx1
\n— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026
\nप्रत्युत्तरात मुंबई इंडियन्ससाठी लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन या दोघांनी मिळून संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली. ज्यामुळे सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. रोहित आणि रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची सलामीची भागीदारी केली, जी आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सची तिसरी सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली. रोहित शर्मा ३८ चेंडूंमध्ये ७८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर रायन रिकल्टनने ८१ धावा केल्या. मुंबई इंडियन्सने १९.१ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. केकेआरकडून वैभव अरोरा, कार्तिक त्यागी आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.