Madhuri Misal – मुंबईत एससी, एसटी किंवा ओबीसी आरक्षण देण्यास नियमांमध्ये कोणतीही मुभा नव्हती. त्यामुळे प्रक्रियेत बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही संपूर्ण सोडत प्रक्रिया लाईव्ह दाखवण्यात आली असून, पारदर्शकतेवर शंका घेण्याचे कारण नाही, असा खुलासा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केला. आरक्षण सोडतीदरम्यान झालेल्या वादावर माधुरी मिसाळ यांनी माध्यमांशी संवाद साधत संपूर्ण प्रक्रियेचे सविस्तर स्पष्टीकरण दिले. माधुरी मिसाळ म्हणाल्या, आरक्षण सोडत ही पूर्णपणे कायद्यानुसार आणि लोकसंख्येच्या निकषांवर आधारित आहे. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, महिला आरक्षण आणि खुला प्रवर्ग यांचा समतोल साधून ही प्रक्रिया पार पाडल्याचे त्यांनी सांगितले.