Mauritius Maharashtra Bhavan Inauguration : मराठी संस्कृतीचा झेंडा आता सातासमुद्रापार फडकणार आहे. मॉरिशसच्या मोकामध्ये महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा पार पडला. मोका येथे ‘महाराष्ट्र भवनाच्या’ विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या विस्तारित वास्तूसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून आता ही वास्तू अधिक भव्य स्वरूप धारण करणार आहे. मॉरिशसच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान रवींद्र चव्हाण यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नसून भावनिक आणि सांस्कृतिकही आहेत. सात समुद्रांपलीकडे राहत असूनही, येथील मराठी समाज अभिमानाने आपल्या परंपरा, भाषा आणि संस्कृती जपतो, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे असे रवींद्र चव्हाण म्हणाले. तर राष्ट्रपती धरमबीर गोखुल यांनी भारताला “मॉरिशसचा मोठा भाऊ” असे संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. Mauritius Maharashtra Bhavan Inauguration Ravindra Chavan आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबाबत चर्चा रविंद्र चव्हाण आणि मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांच्या सदिच्छा भेटीत सांस्कृतिकसह आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक मुद्द्यांवरही चर्चा झाली. ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांत भारत आणि मॉरिशस कसे एकत्र काम करू शकतात, यावर या बैठकीत भर देण्यात आला. सांस्कृतिक संस्थांना बळ या दौऱ्यात चव्हाण यांनी स्थानिक मराठी संस्थांशी देखील संवाद साधला. मेलरोझ श्री गजानन सरस्वती मंदिर, विठोबा रखुमाई मराठा मंदिर, आणि पाल्मा मराठी सभा यांसारख्या विविध संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत अनुदानाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. तर ‘महा गणेशोत्सव 2025′ च्या तयारीसाठीही विशेष सहकार्य जाहीर करण्यात आले. Mauritius Maharashtra Bhavan Inauguration विशेष म्हणजे, मॉरिशसमधील मोका येथील या नूतन वास्तूतील मुख्य सभागृहाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाचे स्थानिक मराठी बांधवांनी उत्स्फूर्त स्वागत केले. हेही वाचा: SPPU News : कुलसचिवपदाची नियुक्ती गुलदस्त्यातच! विद्यापीठ प्रशासनाकडून अद्यापही अधिकृत घोषणा नाही