School Admission Rules : नवीन शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी मुलाचे किमान वय ६ वर्षे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाईल. या नियमांमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. School Admission Rules यापूर्वी पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा ३१ मार्च पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली आहे. या संदर्भात डिसेंबर २०२५ मध्ये सरकारने आदेश जारी केला होता. School Admission Rules School Admission Rules राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खाजगी अशा सर्व शाळांसाठी हा नियम समानपणे लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांना त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, योग्य वयात शिक्षण सुरू झाल्यास मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास अधिक चांगल्या प्रकारे होतो. तसेच मुलांना बालपणाचा आनंदही अनुभवता येतो. प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्र हेच वयाचा अधिकृत पुरावा मानले जाणार आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाचा कालावधी इयत्ता पहिली ते आठवी असा असून तो साधारणपणे ६ ते १४ वर्षे वयोगटासाठी निश्चित करण्यात आला आहे.