Maharashtra Elections 2026 : राज्यातील १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडले. त्यानंतर आज (सोमवारी) या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानुसार मतमोजणीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान झाले आहे. MSRTC New Bus : एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस! ५५ आसनी गाड्यांचा भगवा थाट; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये निवडणुकीत ६८.२८ टक्के मतदान जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी २६२४ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या १४६२ जागांसाठी ४८१४ उमेदवार नशिब आजमावत आहेत. या निवडणुकीत ६८.२८ टक्के मतदान झाले. राज्यातील एकूण १ कोटी ४१ लाख ९० हजार २११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात ७४.८९ टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान रत्नागिरीत ५५.७९ टक्के इतके झाले. Maharashtra Elections 2026 अजित पवारांच्या निधनानंतर निवडणुकीचा प्रचार थंडावला यापूर्वी झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. Maharashtra Elections 2026 मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार थंडावला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर प्रमुख नेत्यांनी प्रचारसभा न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आज जाहीर होणाऱ्या या निकालांकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. EVM Security : ईव्हीएम ‘स्ट्राँग रूम’मध्ये सील! 24 तास सीसीटीव्हीचा पहारा अन् कडेकोट पोलीस बंदोबस्त अंतिम निकालाची प्रतीक्षा दरम्यान, ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेली आहे त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी प्रलंबित असल्याने अंतिम निकालाची प्रतीक्षा आहे. हेही वाचा: Baramati By-Election : बारामती पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! मतदारयादीचा नवा कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत नोंदवा नाव