Beed News | बीडमधील गुन्हेगारी वृत्तीचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री 10 ते 15 जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. अहिल्यानगर – बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र हल्ला कुणी केला कारण काय या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. राम खाडे यांना गंभीर दुखापत राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत. ते मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत होते. राम खाडे मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत असताना दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी थांबवून थेट हल्ला चढवला. या हल्लेखोरांनी खाडे यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली आणि नंतर धारदार शस्त्रांनी राम खाडे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये राम खाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. राम खाडे यांना प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते. Beed News | दरम्यान, हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. खाडे यांच्या तक्रारीनंतर बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. एकीकडे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. असे असताना ऐन निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. Beed News | हेही वाचा: भाजप- शिवसेना अंतर्गत धूसफूसची चर्चा; शरद पवारांंच्या प्रदेशाध्यक्षांनी टायमिंग साधलं, राज्यात मोठा राजकीय भूकंप? म्हणाले…