Nagpur Leoprad | राज्यातील अनेक भागात सध्या बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. यातच आज पहाटे नागपूर शहरातील पारडी भागात बिबट्याने अचानक काही नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली. बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग तसेच पोलिसांनी बिबट्या लपून बसलेल्या घराच्या अवतीभवती कडक पहारा ठेवला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीतून बिबट्याच्या शरीरावर दोन डार्ट मारले. मात्र, त्याअवस्थेतही बिबट्याने 15 फूट उंच उडी मारली आणि दुसऱ्या गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गुंगी आल्याने तो गच्चीवर लटकून राहिला आणि हा बिबट्या खाली पडल्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला घेतले. मात्र बघ्यांची मोठी गर्दी आणि सातत्याने केल्या जाणारा आवाज यामुळे बिबट्याला पकडण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. दोन दिवसांपूर्वी एक बिबट्या कापसी भागात दिसला होता. हल्ला केल्यानंतर हा बिबट्या पारडी भागातील एका दुमजली इमारतीत लपला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस मोठे प्रयत्न करत आहेत. लवकरच बिबट्याला जेरबंद केले जाईल, असा विश्वास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. Nagpur Leoprad | बिबट्याच्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये संताप या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये वनविभागाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी पारडी परिसरात दोन बिबट्यांनी दहशत निर्माण केली होती, त्यापैकी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले. परंतु, दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले. दरम्यान, बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागपूर, नाशिक, रायगड आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हेही वाचा: मोठी घडामोड! अखेर महाविकास आघाडीला मिळाली मनसेची साथ! ‘या’ महापालिका निवडणुकीसाठी अधिकृत युती जाहीर