Lata Asha Hospital : मंगेशकर कुटुंबीयांकडून उभारल्या जाणाऱ्या भव्य रुग्णालयाच्या नावात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी जाहीर केल्यानुसार, पूर्वी ‘लता मंगेशकर हॉस्पिटल’ असं प्रस्तावित असलेलं नाव आता ‘लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ असं करण्यात येणार आहे. (Lata Asha Hospital) या प्रकल्पाचं भूमिपूजन 16 एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहितीही देण्यात आली. यापूर्वी या रुग्णालयाला केवळ लता मंगेशकर यांचं नाव देण्याचा निर्णय झाला होता. मात्र अलीकडेच आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ नावात बदल करून दोन्ही दिग्गज भगिनींचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Lata Asha Hospital) पुण्याजवळील नांदोशी येथे सुमारे 40 एकर जागेत हे अत्याधुनिक रुग्णालय उभारलं जाणार आहे. विविध वैद्यकीय विभागांसह रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळेची सुविधा देखील येथे उपलब्ध करून दिली जाणार आहे. समाजोपयोगी उद्देशातून हा प्रकल्प साकारला जात असून आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा मंगेशकर कुटुंबीयांचा मानस आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं की, या कार्यक्रमासाठी आशा भोसले स्वतः उपस्थित राहणार होत्या. मात्र अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून रुग्णालयाच्या नावात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. “दुःखावर मात करत कर्तव्य पार पाडावं,” ही लतादीदींची शिकवण असल्याचं त्यांनी नमूद केलं. (Lata Asha Hospital दरम्यान, भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर, सुरांची जादू निर्माण करणाऱ्या आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालं. दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (Lata Asha Hospital)