२०१६ पासून युकेमध्ये राहत असलेल्या विजय मल्ल्याने उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. एक त्यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या आदेशाला आव्हान देते आणि दुसरी २०१८ च्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. जानेवारी २०१९ मध्ये, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) खटल्यांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाने विजय मल्ल्या यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले. अनेक कर्जे बुडवण्याचे आणि मनी लाँडरिंगचे आरोप असलेल्या मल्ल्याने मार्च २०१६ मध्ये भारतातून पळ काढला.
\nललित मोदी २०१० पासून फरार Lalit Modi viral video।
\nदुसरीकडे, करचोरी, मनी लाँडरिंग आणि आयपीएलशी संबंधित प्रॉक्सी मालकीच्या आरोपांमुळे ललित मोदी २०१० मध्ये भारतातून पळून गेला. अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) दावा आहे की ललित मोदीने २००९ मध्ये आयपीएल प्रसारण हक्क वाटप प्रक्रियेत घोटाळा केला आणि १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त लाच घेतल्याचा आरोप आहे.