Ladki Bahin Yojana: राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले होते, त्यांना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे एकूण ४५०० रुपये एकत्रित मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील प्रचारसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. ई-केवायसी त्रुटींमुळे थांबलेले पैसे मिळणार – अनेक महिलांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेतील त्रुटींमुळे गेल्या तीन महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी होती. यावर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, “ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणांमुळे थांबले आहेत, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र महिलांच्या खात्यात ३ महिन्यांचे पैसे एकाच वेळी जमा होतील.” Ladki Bahin Yojana तसेच त्यांनी बहिणींना २१०० रुपये देण्याचे दिलेले आश्वासनही लवकरच पूर्ण होणार असल्याचे संकेत दिले. “लाडकी बहीण ही माझी अत्यंत आवडती योजना आहे. माझ्या आईच्या प्रेरणेतून ही संकल्पना जन्माला आली. मला माझ्या राज्यातील बहिणींना केवळ मदत करायची नाही, तर त्यांना लखपती होताना पाहायचे आहे.”, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांवर टीका – या सभेत बोलताना शिंदेंनी विरोधकांवरही निशाणा साधला. “आम्ही बहिणींना आर्थिक बळ देत आहोत, पण काही लोक केवळ टीका करण्याचे काम करत आहेत. तुम्ही स्वतः काही दिले नाही आणि आम्ही देतोय तर त्यावरही तुमचे आक्षेप आहेत,” अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. यासोबतच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक समिती गठीत करण्यात आली असून, अहवाल प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. Stock Market: सेन्सेक्समधील 30 प्रमुख शेअर्सपैकी केवळ ‘हे’ 4 वधारले; गुंतवणूकदारांचे 2.52 लाख कोटींचे नुकसान