Kangana Ranaut Slams Congress: लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलू शकले नाहीत हा एक मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. भाजप खासदार मनोज तिवारी आणि कंगना राणावत यांनी या घटनेवरून गंभीर आरोप करत विरोधकांवर तीव्र टीका केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी याठिकाणी लोकसभा खासदार कंगना राणावत (Kangana Ranaut)यांनी दावा केला आहे की, “मंगळवारी लोकसभेत पंतप्रधानांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यापूर्वी काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांचा मार्ग पूर्णपणे रोखला. विरोधी खासदारांनी सभापतींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि थेट पंतप्रधानांवर हल्ला करण्याची योजना आखली असा आरोप राणावत यांनी केला. कंगना राणावत यांनी, “विरोधी पक्षाच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ जमल्या होत्या. अशा वातावरणात पंतप्रधानांना बोलू न देणे हा योग्य निर्णय होता.” असे म्हटले आहे. Kangana Ranaut Slams Congress: Kangana Ranaut Slams Congress दरम्यान, दिल्लीचे खासदार मनोज तिवारी म्हणाले, “त्यांनी (विरोधी पक्षाने) त्यांना पूर्णपणे घेरले, म्हणूनच पंतप्रधान आले नाहीत. त्यांच्या (विरोधी पक्षाच्या) सुमारे ७-८ महिला खासदारांनी पुढे येऊन पंतप्रधानांच्या आसनाची आणि ते ज्या जागेतून बाहेर पडतात त्या जागेची पूर्णपणे अडवणूक केली. पंतप्रधानांना थांबावे लागले असावे.” सभागृह तहकूब केले Kangana Ranaut Slams Congress: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्याची संधी नाकारण्यात आल्याने काँग्रेस खासदार नाराज होते. महिला काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीला घेराव घातला, ज्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृह तहकूब केले. मात्र, पंतप्रधान संसदेत उपस्थित होते आणि प्रतिसाद देण्यास तयार होते. इतिहासातील ही एक दुर्मिळ घटना आहे जेव्हा या महत्त्वाच्या सत्रात पंतप्रधानांचे भाषण झाले नाही.