आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया 16 डिसेंबर 2026 रोजी पार पडणार आहे. या लिलावाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सध्या रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर केकेआर आणि सीएसकेच्या ताफ्यात सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. तर मुंबई इंडियन्सकडे सर्वात कमी 2.75 कोटी रुपये शिल्लक आहेत. मात्र यंदाच्या लिलावात एका नियमाने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण होणार आहे. हा नियम आहे ‘टाय ब्रेकर’. चला तर मग जाणून घेऊया या नियमाबद्दल… नवा टायब्रेकर नियम काय आहे? काही विशिष्ट प्रकरणांमध्ये उच्च स्तरीय गुप्त बोलीच्या समस्येच निराकरण करण्यासाठी हा नियम तयार करण्यात आला आहे.आयपीएलने 2010 मध्ये टाय-ब्रेकर नियम लागू केला. मिनी लिलावासाठी लागू केला गेला होता.एका खेळाडूसाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त संघ आग्रही असतील. त्यांनी लिलावात समान बोली लावली असेल तर हा नियम लागून होतो. बीसीसीआय फ्रेंचायझींना टाय ब्रेकर फॉर्म देईल. यात भारतीय रुपयांमध्ये फ्रेंचायझी गुप्त बोलीची रक्कम भरून ती बीसीसीआयकडे सोपवतील. ही रक्कम खेळाडूला दिली जाणार नाही. तर ती रक्कम फ्रेंचायझी बीसीसीआयला देईल. याला ‘टाय-ब्रेकर बोली’ म्हटलं जातं. टायब्रेकर फॉर्ममध्ये जास्त रक्कम असलेल्या फ्रेंचायझीला सदर खेळाडू दिला जाईल. पण खेळाडूची किंमत दोन्ही संघांनी लॉक केलेल्या किंमतीइतकीच राहील. तर टायब्रेकर फॉर्ममध्ये भरलेली रक्कम बीसीसीआयला द्यावी लागेल. गुप्त बोली जिंकणाऱ्या संघाला 16 डिसेंबरच्या लिलावाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत ती रक्कम भारतीय रुपयांमध्ये बीसीसीआयला द्यावी लागेल. बोली प्रक्रियेत गुप्तता पाळली जाईल. यापूर्वी, किरॉन पोलार्ड, शेन बाँड आणि रवींद्र जडेजा सारख्या खेळाडूंना गुप्त बोलीद्वारे खरेदी केले गेले होते. त्यामुळे कोणत्या खेळाडूवर जर दोन फ्रेंचायझी अडून राहिल्या तर अडून राहिल्या. तर त्या खेळाडूचा निर्णय हा ट्रायब्रेकरच्या माध्यमातून होईल. उदा. जर एखाद्या खेळाडूवर ४ कोटी बोली लागली आणि जर दोन फ्रेंचायझी 4 कोटी रुपयांवर अडून राहिल्या. तर त्या खेळाडूचा निर्णय हा ट्रायब्रेकरच्या माध्यमातून होईल. ट्रायब्रेकरमध्ये एका फ्रेंचायझीने 1 कोटी आणि दुसऱ्या फ्रेंचायझीने 2 कोटी भरले. तर सर्वाधिक रक्कम भरलेल्या संघाला खेळाडू दिला जाईल. म्हणजे 2 कोटी रक्कम भरलेल्या फ्रेंचायझीला सदर खेळाडू दिला जाईल. यामुळे खेळाडूला 4 कोटी मिळतील आणि 2 कोटी बीसीसीआयला देण्यात येतील.