Nagarpanchayat Election Result 2025 | राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा फैसला आज होणार आहे. मतदारांचा अंतिम कौल आज मतमोजणीनंतर समोर येणार आहे. त्यानुसार आता पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पोस्टल मतमोजणीत भाजप आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएम मतमोजणी सुरू होणार आहे. मत मोजणीला सुरुवात होण्याआधी पोस्टल बॅलेटद्वारे केलेल्या मतांचा आढावा घेतला जातो. सध्या सुरू झालेल्या मतमोजणीनुसार, भाजपने मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. महायुती 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीत तुलनेने काँग्रेसचं थोडं चांगलं प्रदर्शन दिसून येतय. मित्रपक्षांमध्येच चुरशीचा सामना स्थानिक स्वराज्य संस्था सर्वच पक्षांसाठी महत्वाच्या आहेत. राज्यात एकीकडे महायुती व महाविकास आघाडी अशा दोन परस्परविरोधी आघाड्या असताना स्थानिक पातळीवर मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी चक्क सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातच युती दिसून आली. तर काही ठिकाणी थेट सत्तेतील मित्रपक्षांमध्येच चुरशीचा सामना झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या निवडणुकांमध्ये वेगळ्या प्रकारची राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहे. Nagarpanchayat Election Result 2025 | हेही वाचा: मतमोजणीपूर्वी ‘या’ तीन ठिकाणी भाजपचा विजय; महिलाराज असल्याचा निकाल समोर