२०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशनने पहिल्या चेंडूपासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने अवघ्या ३२ चेंडूत ७६ धावा ठोकल्या (११ चौकार, ४ षटकार). विशेष म्हणजे, त्याने केवळ २१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा तो भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचा स्ट्राईक रेट २३७.५० इतका होता. त्याने यासह अभिषेक शर्माचा सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला.
\n\nसूर्यकुमार यादवने साकारली ८२ धावांची वादळी खेळी
‘सूर्या’ची फटकेबाजी अन् विश्वविक्रम –
\nइशान किशन बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदानाचा ताबा घेतला. ‘मिस्टर ३६०’ ने अवघ्या ३७ चेंडूत नाबाद ८२ धावांची आतिशी खेळी केली. यात ९ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. सूर्याने अवघ्या २३ चेंडूत पन्नास गाठली. त्याला शिवम दुबेने (१८ चेंडूत ३६* धावा) उत्तम साथ दिली. भारताने हे लक्ष्य १६ षटकांच्या आत पूर्ण केले, अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिला संघ ठरला आहे.