Sunil Tatkare : अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याचा मोठा दावा केला जात आहे. थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. या सगळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजलीपर लेखात विलिनीकरणावर भाष्य केले आहे. अदृश्य शक्तींनी दबाव आणला, खोटे षडयंत्र रचले आणि आरोप केल्यामुळे अजित पवार यांना वेगळा गट स्थापन करावा लागला. झालेल्या घटनेची कल्पना आपल्याला असून आता झालेली चूक पुन्हा सुधरायची असे म्हणत अजित पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी बैठका घेत होते, असा मोठा दावा शशिकांत शिंदे यांनी लेखात केला आहे. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पश्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शशिकांत शिंदे यांचे लेखान गैर आणि अनाठायी असल्याचे सुनील तटकरे म्हणाले आहेत. तसेच सुनील तटकरे यांनी विलिनीकरणासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. प्रस्ताव आला तर चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. विलिनीकरणाविषयी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, या संदर्भातील निर्णय जेव्हा कोण चर्चा सुरू करेल, त्यावेळीला वहिनी आहेत कारण त्या आमच्या नेत्या आहेत. उपमुख्यमंत्री आहेत, असा प्रस्ताव मांडल्यास त्यासंदर्भात पक्षाच्या कोअर रुममध्ये चर्चा होऊ शकते, अशी मोठी विलिनीकरणासंदर्भात प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. भाजपसोबत असले पाहिजे अशी भूमिका दादांची होती असे देखील तटकरेंनी यावेळी बोलताना सांगितले. हेही वाचा : Pune News: पीएमआरडीएमध्ये डीपीऐवजी स्ट्रक्चर प्लॅन; नगर विकास विभागाचे प्राधिकरणाला आदेश