Pankaja Munde : काल 26 मार्च रोजी श्री रामनवमी असल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्यात देखील ठिकठिकाणी शोभायात्रा काढून राम नामाचा गजर झाला. राजकीय नेते देखील शोभायात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. श्री राम नवमीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील भायाळा गावात मंत्री पंकजा मुंडे यांनी एक भावनिक भाषण केले आहे. भाषणात त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेत त्यांची आठवण काढली. गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरु देणार नाही, मी ही शपथ चितेवर खाल्ली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही, असे भावनिक विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. Pankaja Munde विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे या बीड दौऱ्यावर होत्या. दिवसभरात त्यांनी श्रीराम नवमी उत्सवाच्या कार्यक्रमात सहभाग दर्शवला. त्यानंतर पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहास भेट देत भावनिक भाषण केले. Pankaja Munde : ‘गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरु देणार नाही’; पंकजा मुंडेंचं भावनिक विधान म्हणाल्या “माझ्या कातड्याचे जोडे केले आणि…” लोकसभा पराभव झाल्यानंतर माझ्या भावांनी आत्महत्या केल्या. इतकं प्रेम तुम्ही मला दिलं. अशी प्रतिक्रिया देखील मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. राजकारण संपल्यानंतर मी सुद्धा हरिभक्त पारायणाकडे जाणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. Pankaja Munde सगळे प्रेमाने राहा एकजुटीने राहा एकमेकांचा हात धरून रहा, असे आवाहन उपस्थित भाविकांना पंकजा मुंडेंनी केले. परळीतील काळाराम मंदिराला मोठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीनिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा होत असताना पंकजा मुंडे यांनी स्वतः पाळणा हलवून प्रभू रामाला अभिवादन केले. यावेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. Pankaja Munde हेही वाचा : Vijay-Rashmika: “रश्मिका-विजयचा खास अंदाज; लग्न घडवणाऱ्यांचे मानले आभार”