निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
\nयावेळी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगात बसलेली व्यक्ती अमित शहांच्या सहकार विभागाचे सचिव होते, असा दावा करत त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “हरियाणा आणि बिहारमध्ये भाजपने जबरदस्तीने सत्ता मिळवली आहे. आता असाच प्रयत्न बंगालमध्ये सुरू आहे, पण तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
‘महाराष्ट्रातील निवडणूक भाजपने चोरली’
\nभाजपवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचाही उल्लेख केला. “भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने महाराष्ट्रातील निवडणूक चोरली आहे. आता वैध मतदारांची नावे हटवून आणि ‘विशेष गहन दुरुस्ती’च्या (SIR) नावाखाली बंगालमध्येही तेच करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सत्तांतर झाले, त्यावर भाष्य करत त्यांनी भाजपच्या निवडणूक रणनीतीवर सडकून टीका केली.
बंगालमध्ये भाजपचा विजय अशक्य
\n“भाजपने कितीही प्रयत्न केले तरी ते बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जिंकू शकणार नाहीत. बंगालमध्ये केवळ तृणमूल काँग्रेसच (TMC) जिंकेल आणि त्यानंतर आम्हाला दिल्लीही जिंकायची आहे. भाजप देशाला योग्य दिशा देऊ शकत नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, बंगालमध्ये बोलणाऱ्यांना बांगलादेशी ठरवण्याचे राजकारण भाजप करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.