Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने १९८९ साली प्रदर्शित झालेल्या आणि ब्लॅाकबस्टर ठरलेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अभिनेता सलमान खानसोबत काम केलं. या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सुरुवातीला हा चित्रपट नाकारला होता, असा मोठा खुलासा केला आहे. रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने सांगितलं की, त्यावेळी अभिनेत्री केवळ १८ वर्षांच्या होती आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. अभिनय क्षेत्रात येण्याचा तिचा कोणताही विचार नव्हता. पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं तिचं स्वप्न होतं. (Bhagyashree Patwardhan) याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मी चित्रपटांमध्ये काम करण्याचा कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे सुरुवातीला मी ‘मैंने प्यार किया’साठी नकार दिला होता.” यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्याशी झालेल्या चर्चेचाही किस्सा तिने सांगितला. “मी सूरजजींना सतत वेगवेगळी कारणं द्यायचे. मी काही विशिष्ट प्रकारचे कपडे घालणार नाही, मला आधी शिक्षण पूर्ण करायचं आहे, त्यानंतरच शूटिंग करेन, अशा अनेक अटी मी ठेवल्या होत्या. पण प्रत्येक वेळी त्यांच्याकडे उत्तर तयार असायचं,” असं अभिनेत्रीने सांगितलं. Bhagyashree Patwardhan : “मला चित्रपट करायचाच नव्हता”; इतक्या वर्षांनी भाग्यश्रीचा ‘मैंने प्यार किया’बाबत मोठा खुलासा भाग्यश्रीच्या मते, सूरज बडजात्या यांनी तिच्या सर्व अटी मान्य केल्या आणि या भूमिकेसाठी आम्हाला फक्त तूच हवी आहेस, असं सांगून तिला चित्रपटासाठी तयार केलं. ‘मैंने प्यार किया’ प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री भाग्यश्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्या दिवसांच्या आठवणी सांगताना अभिनेत्रीने एक खास किस्साही शेअर केला. “त्या काळात पोस्टमन घरी पत्रं आणायचा. आम्ही पहिल्या मजल्यावर राहत होतो आणि तळमजल्यापासून वर जाणारा संपूर्ण जिना चाहत्यांच्या पत्रांनी भरलेला असायचा,” असं तिने हसत सांगितलं. दरम्यान, भाग्यश्री सध्या रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अभिनेत्रीने स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. हेही वाचा : Dewas Factory Blast: देवासमधील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट ; १५ जण ठार झाल्याची भीती,अनेक जण जखमी