Sunil Tatkare : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातसोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. खरातला राजकीय नेत्यांचा वरदहस्त होता का? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. अशोक खरातसोबतच्या फोटोंमुळे आणि त्याच्यासोबतच्या जवळीकतेमुळे रुपाली चाकणकरांना दोन महत्वाच्या पदांवर पायउतार व्हावे लागले. त्यांच्यावर या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध आरोप तसेच टीका करण्यात आली. नुकत्याच दिलेल्या एका पॅाडकास्ट मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. तसेच तटकरे यांचे देखील अशोक खरातसोबत फोटो समोर आल्याने त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत आपली भूमिका स्पष्ट केली. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे यात कोणाचं दुमत नव्हतं, असे म्हणत एक दोन दिवसानं की तीन दिवसांनी मला माहिती नाही त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी त्यांची बाजू मांडली असेल बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार राहू शकतो, असे सुनील तटकरे यांनी चाकणकरांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. अशोक खरातसोबत सुनील तटकरे यांचे देखील फोटो समोर आले आहेत. त्यामुळे तटकरे देखील अशोक खरातकडे जात होते असा आरोप केला जात आहे. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, अशोक खरातसोबत अनेक राजकीय पक्षातील नेत्यांचे फोटो आले आहेत. माझाही आहे मी नाही कधी म्हटलं. कोणाची ओळख असणं, कार्यक्रमाला जाणं याचा ती व्यक्ती विकृतपणे काय करतेय हे माहिती नसते. काही त्यांच्या लग्न विवाह किंवा कुठल्या समारंभासाठी गेले असतील. काही जण मंदिरात गेले असतील. याचा अर्थ घृणास्पद कृत्यात कोण सहभागी होणं म्हणजे त्या प्रत्येकावर अन्याय होईल, असे म्हणत होत असलेल्या आरोपांवर तटकरेंनी स्पष्टीकरण दिले. खरातसोबत कशी ओळख झाली? अशोक खरातसोबत कशी ओळख झाली असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना तटकरे म्हणाले, अशोक खरात सोबत कशी ओळख झाली ते आठवत नाही. एक दोनदा भेट झाली, लग्नाला गेलो होतो, तो भाग वेगळा आहे. माझ्यासह अनेकांच्या भेटी झाल्या. एसआयटीची चौकशी खोलवरपणे केली जाते. एसआयटीतून सत्य बाहेर येईल, त्यात संदेह असण्याचं कारण नाही. एसआयटी वेगानं तपास करतेय, असे सांगत नराधमाला जितकी कठोरात कठोर शिक्षा द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जावीच, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. हेही वाचा : Stock Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी…! सेन्सेक्स १८७६ अंकांनी वधारला ; निफ्टीने २२,८९९ चा टप्पा ओलांडला