\n\nInnings Break!
\nPrasidh Krishna’s best #TATAIPL figures keep #LSG to 164/8 🫡
\nWill #GT chase it down to register their second win of the season? 🤔
\nUpdates ▶️ https://t.co/kIuuJYbiNx#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvGT pic.twitter.com/eLON7m3k1X
\n— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
\nलखनौच्या डावात निकोलस पूरन (१९), अब्दुल समद (१८) आणि मुकुल चौधरी (१८) यांना चांगली सुरुवात मिळाली, पण मोठ्या धावसंख्येत त्याचे रूपांतर करता आले नाही. मोहम्मद शमीने शेवटच्या टप्प्यात ५ चेंडूत नाबाद १२ धावा केल्यामुळे लखनौला ८ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून प्रसिध कृष्णाने २८ धावांत ४ बळी घेत लखनौचे कंबरडे मोडले, तर अशोक शर्माने २ बळी टिपले.
\n\n50 number 2️⃣6️⃣ for The BOSS in #TATAIPL 😎
\nJos Buttler racing #GT towards another win 🏎️@gujarat_titans need 37 runs from 36 balls
\nUpdates ▶️ https://t.co/kIuuJYbiNx#KhelBindaas | #LSGvGT pic.twitter.com/d7iOnQl5ai
\n— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
\nप्रत्युत्तरात १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात सकारात्मक झाली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन (१५) यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. सुदर्शन बाद झाल्यावर मैदानात आलेल्या जोस बटलरने कर्णधार शुबमन गिलसोबत ८४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. गिलने ४० चेंडूत ५६ धावा केल्या, तर बटलरने अवघ्या ३७ चेंडूत ६० धावांची खेळी साकारली. या दोघांच्या अर्धशतकांमुळे गुजरातचा विजय सुकर झाला. शेवटी वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया यांनी शांतपणे सामना संपवत गुजरातला विजय मिळवून दिला.