Gautami Naik : वुमेन्स प्रिमियर लीग (WPL) 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (आरसीबी) महिला संघाने अपराजित राहण्याचा विक्रम कायम राखला आहे. संघाने सलग पाचव्या सामन्यात विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला. या सामन्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते आरसीबीच्या ऑलराऊंडर गौतमी नाईकने. गुजरात जायंट्सविरुद्ध वडोदऱ्यात खेळवलेल्या या सामन्यात गौतमीने आपल्या पहिल्या WPL अर्धशतकासह (73 धावा, 55 चेंडू) संघाला 178/6 पर्यंत नेले आणि नंतर गोलंदाजांनी 61 धावांनी विजय मिळवला. गौतमी नाईकची जबरदस्त कामगिरी आरसीबीला सुरुवातीला धक्के बसले होते. पहिल्या षटकातच ग्रेस हॅरिस बाद झाली आणि लवकरच 9/2 अशी स्थिती निर्माण झाली. मात्र, गौतमी नाईकने स्मृती मंधाना (26) सोबत भागीदारी करून संघाला सावरले. नंतर रिचा घोष (27) सोबतही तिने आक्रमक फलंदाजी केली. गौतमीने 55 चेंडूत 73 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 1 षटकार सामील होते. तिच्या या खेळीने दोन 50+ भागीदाऱ्या घडवल्या आणि आरसीबीला मजबूत धावसंख्या दिली. सामन्यानंतर तिला ‘बिग बास्केट प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला. A moment Gautami Naik will never forget 👌🏻 She wasn’t ready for this surprise from her cricketing idol 🔝📱 A moment to remember forever. ✨🏏#TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvRCB | @hardikpandya7 | @RCBTweets pic.twitter.com/Th9z5nmzqY — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 20, 2026 हार्दिक पांड्याला आयडॉल मानणारी गौतमी सामन्यानंतरच्या मुलाखतीत गौतमीने आपला आयडॉल हार्दिक पांड्या असल्याचे सांगितले. “माझा क्रिकेट आयडॉल हार्दिक पांड्या सर आहेत. मी त्यांच्या खेळातील हायलाइट्सपेक्षा दबावाच्या परिस्थितीत शांत राहण्याच्या आणि मॅच जिंकून देण्याच्या कौशल्याचे विशेष कौतुक करते. कठीण प्रसंगात ते ज्या संयमाने खेळतात, तेच माझे प्रेरणास्थान आहे. मी त्यांच्यासारखे खेळू इच्छिते,” असे तिने भावपूर्णपणे सांगितले. हार्दिकचा सरप्राइज मेसेज मुलाखत सुरू असतानाच गौतमीला एक आश्चर्यकारक बातमी सांगण्यात आली. तिच्या आयडॉल हार्दिक पांड्याने तिच्यासाठी खास व्हिडीओ मेसेज पाठवला आहे. हे ऐकताच गौतमीला विश्वास बसला नाही. “सिरियसली? OMG!” असा उद्गार काढत तिच्या चेहऱ्यावर एक निरागस, आनंदी हास्य उमटले. ती प्रचंड भावूक झाली. हार्दिकने आपल्या मेसेजमध्ये म्हटले, “हाय गौतमी, मला समजले की मी तुझा क्रिकेट आयडॉल आहे, हे ऐकून खूप छान वाटले. तरुण खेळाडूंना प्रेरणा देणे ही मोठी गोष्ट आहे. तुझ्या पहिल्या अर्धशतकाबद्दल खूप अभिनंदन! खेळाचा आनंद घे, शिस्त पाळ आणि फ्रँचायझी तसेच देशासाठी आणखी मोठी कामगिरी करत राहा.” WPL सारख्या व्यासपीठामुळे स्थानिक आणि अनकॅप्ड खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसण्याची संधी मिळते. गौतमी नाईकसारख्या तरुण खेळाडूने आपल्या मेहनतीने आणि प्रेरणादायी आयडॉलच्या मार्गदर्शनाने हे व्यासपीठ गाजवले. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या खेळाडूला आदर्श मानून सराव करता आणि तोच खेळाडू तुमच्या कामगिरीचे कौतुक करतो, तेव्हा आत्मविश्वास द्विगुणित होतो. गौतमीच्या चेहऱ्यावरील हास्य आणि भावूकता यातून हे स्पष्ट दिसत होते. ही पावती तिच्या आगामी कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आरसीबीचा हा विजयी क्रम आणि गौतमीचा हा खास क्षण WPL 2026 मध्ये खूप चर्चेत राहिला आहे.