Ganesh Naik | राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकींसाठीचे मतदान आजपासून सुरू झाले आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात असून अनेक दिग्गज नेतेमंडळींनीही मतदानाचा हक्क बजवला आहे. मात्र काही ठिकाणी मतदान केंद्रांवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. नवी मुंबईत मतदान असलेले वनमंत्री गणेश नाईक आज सकाळी मतदानासाठी केंद्रावर पोहोचले होते. मात्र त्या केंद्रावरील मतदार यादीत त्यांचं नाव नव्हतं. अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या केंद्रावर जाण्यास सांगितलं. मात्र तेथेही गणेश नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावं नसल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र एक तासाच्या धावपळी नंतर अखेर वनमंत्री गणेश नाईक आणि परिवाराचे मतदान पुर्ण झाले आहे. याप्रकरणी गणेश नाईक यांनी निवडणूक आयोग यंत्रणेच्या घोळावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच वनमंत्र्यांबाबत जर असे घडतं असेल तर सर्व सामन्यांचे काय असा सवालही उपस्थित केला. हेही वाचा: Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं जनतेला आवाहन; मतदानाचं महत्त्व अधोरेखित करणारा व्हिडिओ शेअर