Vijay Wadettiwar : राज्यात नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध दावे केले जात आहेत. अगोदरच मंत्रातील कार्यालयात कारकूनाने लाच स्विकारताच्या प्रकरणात अडचणीत सापडलेले नरहळी झिरवाळ पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्याने एक मोठा दावा केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्याच पक्षातील नेत्याने सार्वजनिक केल्याचे काँग्रेस पक्षातील बड्या नेत्याने म्हटले आहे. “प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे. स्पर्धा खूप आहे, एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच आहे. त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी तिसरा लाईनीत येत आहे अशामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे.” असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. “झिरवळांची जागा खाली करून घेण्यासाठी एक माजी मंत्री आहे अशी चर्चा सुरू आहे. जर पेन ड्राईव्हसमोर आला तर त्या ठिकाणी किमान तीन मंत्र्यांच्या विकेट पडतील अशा गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यात व्हिडिओ क्लिप आहेत, म्हणजेच झिरवाळ यांचा हा व्हिडीओ त्यांच्याच पक्षातील माजी मंत्र्याने झिरवाळांना मंत्रिपदावरुन खाली खेचण्यासाठी समोर आणल्याचा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. Vijay Wadettiwar “जे नको आहे ते टारगेट होत आहेत,” असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी केले आहे भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्राचे झालेले नैतिक अधःपतन अत्यंत लाजिरवाणे आहे, असेही ते म्हणाले आहेत. आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हायरल व्हिडिओप्रकरणी भाष्य केले आहे. झिरवाळांवर सडकून टीका Vijay Wadettiwar Vijay Wadettiwar आधी स्वतःची पैशांची भूक भागवण्यासाठी या महाशयांनी थेट मंत्रालयात भ्रष्टाचाराचे दुकान थाटले, मात्र मुख्यमंत्र्यांच्या कृपेने त्यांचे ते पाप झाकले गेले. आता ज्याप्रकारे सरकारी निवासाचा गैरवापर केले ते अत्यंत निंदनीय आहे. हे मंत्री यापुढे राज्याची सेवा करण्यास नैतिकदृष्ट्या लायक नाही, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. हेही वाचा : AC Buying Guide: ऑनलाइन एसी खरेदी करताय? या ‘६’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान