Dhananjay Sawant : गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर बारामतीजवळ भीषण अपघातीची घटना घडली आहे. या अपघातात माजी मंत्र्याच्या पुतण्याच्या कारला कंटनरेची धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय सावंत (Dhananjay Sawant) हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत फॉर्च्युनर कारमधून धाराशिवकडे जात होते. मध्यरात्री उशिरा बारामतीपासून जवळच असलेल्या भिगवणजवळ त्यांच्या कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. Dhananjay Sawant हेही वाचा : Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याला मिळाला नवा पालकमंत्री; पुन्हा एकदा धुरा राष्ट्रवादी काँग्रेसकडे… यामुळे गाडीचे मोठं नुकसान झाले असून, सुदैवाने माजी जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत थोडक्यात बचावले आहेत. भिगवणजवळील डाळज 2 गावाच्या जवळ हा अपघात झाला. गाडीत असणाऱ्या चालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर घरी परतताना धनंजय सावंत यांच्या कारला कंटेनरने धडक दिली असून अपघाताची घटना घडली असल्याची माहिती आहे. धनंजय सावंत भाजपामध्ये Dhananjay Sawant Dhananjay Sawant Accident शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे धनंजय सावंत हे पुतणे आहेत. नुकतेच त्यांनी कार्यकर्ते आणि सहकुटुंब भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. जिल्हा परिषद निवडणूक भाजपच्या पाठिंबावर अपक्ष निवडून आल्यानंतर धनंजय सावंत यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. हेही वाचा : CDSCO: सीडीएससीओचा मोठा निर्णय; देशभर औषधांसाठी एकसमान परवाना नियम लागू