Devendra Fadnavis : महायुती सरकारमधील तीनही पक्षांच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदांमध्ये अदलाबदल होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्थ खाते मिळवण्यासाठी दोन पक्षांमध्ये रस्सीखेच होऊ शकते. राष्ट्रवादीला अर्थ खात्यावर पाणी सोडावे लागलेच तर महसूल खात्यासाठी आग्रह धरला जाऊ शकतो. (Devendra Fadnavis) त्यामुळे या चढाओढीत कोणत्या मंत्र्यांचा तोटा होऊ शकतो याची चर्चा सध्या रंगली आहे. काही मंत्र्यांकडील खाती ही काढली जाऊ शकतात. तर काही मंत्र्यांना बदलण्याची चर्चाही दबक्या आवाजात सध्या सुरू आहे. (Devendra Fadnavis) एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार हा प्रश्न महायुतीसमोर उभा ठाकला होता. अशावेळी फडणवीसांनी अर्थ खात्याचा भार आणि अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारीही सांभाळली. आता याच अर्थखात्यावरून महायुतीतमधील मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वाढली आहे. अजित पवारांनंतर अर्थखाते भाजपकडे गेले. पण हे खाते भाजपकडे कायमस्वरुपी राहावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही अर्थखाते सोडायची तयारी दाखवून बदल्यात महसूल खाते मागितल्याची चर्चा आहे. (Devendra Fadnavis) दरम्यान मंत्रिमंडळात बदल घडवण्याच्या चर्चेवरून विरोधी गटातून सडकून टीका केली जात आहे. मलाईदार खाते कुणाला मिळावे यासाठी महायुतीमधील पक्षांची रस्सीखेच सुरू असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. दुसरीकडे खातेवाटपाची चढाओढ राष्ट्रवादीसोबतच्या संबंधांमध्ये कटुता आणणार नाही याचीदेखील काळजी फडणवीसांना घ्यायची आहे. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही चर्चा फेटाळली आहे. (Devendra Fadnavis) बावनकुळेंना सोडावे लागणार महसूल खाते? भाजपकडून महसूल खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या खात्यावर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस स्वत:कडे अर्थ खाते कायम ठेवतील. बदल्यात राष्ट्रवादीला चंद्रशेखर बावनकुळेंचे महसूल खाते दिले जाईल. (Devendra Fadnavis) बावनकुळेंचा सन्मान राखण्यासाठी त्यांना फडणीसांकडचे ऊर्जा खाते दिले जाऊ शकते. बावनकुळेंनी यापूर्वीदेखील ऊर्जा खात्याचा पदभार सांभाळल्यामुळे तो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. याशिवाय शिवसेनेच्या सामाजिक न्याय आणि पर्यटन खात्यांचे मंत्रीही बदलले जाऊ शकतात. त्यामुळे मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय खाते आणि मंत्री शंभूराज देसाईंकडच्या पर्यटन खात्याची जबाबदारी इतर कुणाकडे सोपवली जाऊ शकते. (Devendra Fadnavis)