अमेरिकेतला कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी (Epstein Files) संबंधित असलेल्या प्रकरणाने सध्या अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी रात्री जेफ्री एपस्टीनशी संबंधित तब्बल 3 लाख कागदपत्रं सार्वजनिक केली आहेत. हे कागदपत्रं सात सेटमध्ये जारी करण्यात आले असून, या कागदपत्रांमध्ये हजारो छायाचित्रांचा समावेश आहे. ही छायाचित्र सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहेत. ही कागदपत्रं सार्वजनिक होताच अनेक राजकीय नेते, अभिनेते आणि जागतिक स्थरावरील दिग्गजांची नावं चर्चेत आली आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागानुसार सुरुवातील एपस्टीन फाइल्सशी संबंधित चार सेट जारी करण्यात आले होते. त्यानंतर तीन तासांनी आणखी चार सेट सर्वाजनिक करण्यात आले. जवळपास 3,500 हून अधिक फाईल्सचा यामध्ये समावेश आहे, 2.5 GB डेटाच्या या फाईल्स असल्याचे समजत आहे. या दस्ताऐवजामध्ये छायाचित्र, मेल, चौकशीच्या नोट्स आणि इतर रेकॉर्डचा समावेश आहे. मात्र या रेकॉर्डवरून अद्याप हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये की, हे फोटो नेमके कुठे घेण्यात आले आणि कोणत्या ठिकाणी घेण्यात आले आहेत. ही फाईल्स ओपन होताच खळबळ उडाली असून अनेक मोठे नेते अडचणीत सापडले आहेत. एपस्टीन फाईल्समध्ये कोणाकोणाचा समावेश? अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन पॉप स्टार मायकल जॅक्सन ब्रिटनचे प्रिंन्स ॲड्र्यू आणि त्यांची पत्नी सारा फर्ग्यूसन प्रसिद्ध निवेदक – ओप्रा विन्फ्रे हॉलिवूड अभिनेता केविन स्पेसी आणि क्रिस टकर अब्जाधिश आणि प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ज ब्रॅन्सन