Election Commission | राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी आता प्रचारसभा देखील अंतिम टप्यात येऊन पोहचल्या आहेत. याचदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या काही जागांवरील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. नेमकं काय आहे कारण? राज्य निवडणूक आयोगाकडून मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणूक स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे. मनमाडसह धुळ्याच्या पिंपळनेर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 2 ची देखील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. Election Commission | तर, बीडच्या गेवराई नगर परिषद प्रभाग क्रमांक 11 अ च्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला उमेदवाराचे देखील हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दूरदाना बेगम सलीमोद्दीन फारुकी असे या महिला उमेदवाराचे नाव असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गेवराई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यामुळे येथील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. मतदानाला अवघे 5 दिवस शिल्लक दरम्यान, राज्यातील 246 नगरपालिका आणि 46 नगरपंचायत निवडणुकांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मतदानाला आता अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू असून, बड्या नेत्यांच्या आपल्या पक्षातील उमेदवारांसाठी सभा होत आहेत. Election Commission | हेही वाचा: “रवींद्र चव्हाण ज्या ज्या वेळी जिल्ह्यात येतात, तेव्हा…”; निलेश राणेंचा गंभीर आरोप, भाजप प्रदेशाध्यक्षांचे चोख प्रत्युत्तर, कोकणात नेमकं काय घडलं?