Thackeray brothers : मुंबई महापालिकेच्या निमित्ताने राजकीय आणि कौटुंबिक दृष्या दुरावलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंची एकी झाली आणि महाराष्ट्राला एक नवीन समीकरण पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी इच्छा दोन्ही पक्षातील नेत्यासंह महाराष्ट्रातील जनतेची होती. तब्बल १८ वर्षानंतर दोन्ही भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र आले. पण आता दोघांमध्ये बिनसलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे कारण म्हणजे स्विकृत नगसेवक असल्याचे सांगितले जात आहे. उद्धवसेनेच्या कोट्यातून मनसेला एक स्विकृत नगरसेवक द्यावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. या मागणीवर कोणता निर्णय उद्धवसेनेकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्धवसेनेने आपल्या स्विकृत नगरसेवकांची नावे निश्चित केली असून, केवळ घोषणाच बाकी असल्याचे समजते. यावरून ठाकरे बंधूंमध्ये बिनसलं असल्याच्या चर्चां सुरू असतानाचा राज ठाकरे यांचे शिलेदार मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चांना उधाण प्राप्त झाले आहे. कोत्या मनाच्या प्रवृत्ती कडून कधीच स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर यावर उद्धसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही पक्षप्रमुख आहेत एकाच घरातील दोन पक्षाचे प्रमुख आहेत. काल आदित्य यांच्यासोबत राज ठाकरे होते, त्या गोष्टीमध्ये एक मत झालं ते संदीप देशपांडे यांना माहिती आहे का आणि ते मलाही माहिती नाही, मग त्यावर भाष्य करणे हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं त्यावर मी काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली. राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी २० फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीमुळे विविध चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. या भेटीत दोन्ही नेत्यांनी विविध मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पहिली भेट होती. त्यामुळे या भेटीने लक्ष वेधून घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. आपल्याकडे आता पूर्वीसारखं राजकारण राहिलेलं नाहीय. आता काही नाहीय. निवडणुका संपल्या आहेत. आम्हाला जर काही सांगायचे असेल, काही चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील, तर भेट घेतलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची गरज नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते. …अन् उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय २० फेब्रुवारी या दिवशी उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेत उद्धवसेनेच्या स्विकृत नगरसेवकांची नावे निश्चित केली असल्याची माहिती आहे. २८ फेब्रुवारीला या नावांची घोषणा होणार असल्याचे समजते. साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. हेही वाचा : Donald Trump on US court: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी मोठा निर्णय ; जगाला धडकी भरवणाऱ्या आदेशावर केली स्वाक्षरी