Dhar Bhojshala Dispute। मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा याठिकाणी वसंत पंचमीच्या दिवशी होणाऱ्या पूजा आणि प्रार्थनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालायने निर्णय देताना हिंदू आणि मुस्लिम बाजूंचा युकीटवाद एकूण दोन्ही बाजूंच्या प्रार्थनेसाठी वेळ निश्चित केली आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हिंदूंनी १२:०० वाजेपर्यंत प्रार्थना करावी आणि नंतर दुपारी ४:०० वाजता पुन्हा सुरू करावी असे सुचवत या प्रकरणावर तोडगा काढला आहे. न्यायालयाच्या सूचनेला उत्तर देताना, याचिकाकर्त्याने असे म्हटले की, सायंकाळी ५:०० नंतर प्रार्थना करता आल्यास बरे होईल, ज्यावर मुस्लिम वकिलाने उत्तर दिले की, शुक्रवारची प्रार्थना निश्चित आहे आणि ती बदलता येत नाही. Dhar Bhojshala Dispute। हिंदू फ्रंट फॉर जस्टिसने मुस्लिमांना त्या दिवशी तेथे प्रार्थना करण्यापासून रोखण्यासाठी याचिका दाखल केली. याचिकेत म्हटले आहे की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने हिंदूंना दर मंगळवारी आणि वसंत पंचमीला प्रार्थना करण्याची परवानगी दिली आहे, तर मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी १:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत प्रार्थना करण्याची परवानगी आहे. २००३ च्या या आदेशात वसंत पंचमी शुक्रवारी पडल्यास काय होईल हे स्पष्ट केलेले नव्हते. याचिकेत म्हटले आहे की, वसंत पंचमी हा सनातन धर्माच्या अनुयायांसाठी एक अत्यंत पवित्र सण आहे आणि या दिवशी सरस्वती देवीची पारंपारिक पूजा बऱ्याच काळापासून केली जात आहे. जेव्हा जेव्हा वसंत पंचमी शुक्रवारी येते तेव्हा एकाच वेळी पूजा आणि प्रार्थना केल्याने अनेकदा गोंधळ, संघर्ष आणि कधीकधी जातीय तणाव निर्माण होतो.मात्र यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या प्रार्थनेच्या वेळा निश्चित करून दिल्या आहेत. Dhar Bhojshala Dispute।