डब्ल्यूपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने केले सर्वात जलद अर्धशतक
आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. लिझेल ली (३७) आणि शेफाली वर्मा (२०) यांनी ४९ धावांची सलामी दिली. यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने मैदानाचा ताबा घेतला. जेमिमा रॉड्रिग्जने फक्त ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले. महिला प्रीमियर लीगमधील कोणत्याही खेळाडूने केलेले हे सर्वात जलद अर्धशतक आहे. नॅट सायव्हर ब्रंटने गुजरात जायंट्सविरुद्ध फक्त २९ चेंडूत अर्धशतक झळकावले, परंतु तिने ही खेळी एलिमिनेटरमध्ये खेळली. अंतिम सामन्यात रॉड्रिग्जची स्फोटक खेळी साकारली. तिने अवघ्या ३७ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची शानदार खेळी साकारली.
\n\nअखेरच्या षटकांत शिनेल हेन्रीचा ‘रुद्र’ अवतार –
\n\n\nWe’ll let you do the math! 🔢😌
\nChinelle Henry’s power was on full display in that massive 19th over 🔥
\nUpdates ▶️ https://t.co/9sgUo0YqOI#TATAWPL | #ClaimTheCrown | #RCBvDC | #Final | @DelhiCapitals pic.twitter.com/MWZtB2lobq
\n— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 5, 2026
\nजेमिमा बाद झाल्यानंतर लॉरा वॉल्व्हार्डने ४४ धावांचे (२५ चेंडू) योगदान दिले. मात्र, डावाचा खरा शेवट शिनेल हेन्रीने केला. हेन्रीने अवघ्या १५ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर २३३ च्या स्ट्राईक रेटने ३५ धावा चोपल्या. तिच्या या फटकेबाजीमुळे दिल्लीने २०० चा टप्पा ओलांडला. आरसीबीकडून सोफी मोलिनक्स आणि आशा शोभना यांनी विकेट्स घेतल्या, मात्र दिल्लीच्या धावगतीला त्या लगाम लावू शकल्या नाहीत.