Chhagan Bhujbal : आखातात युद्धाचा भडाका उडाला असून त्याचे चटके भारतातील नागरिकांना बसत आहेत. मध्य पूर्वेतील युद्धाची झळ राज्यातील सर्वसामान्यांपासून, हॅाटेल व्यावसायिक अशा अनेकांना बसताना दिसत आहेत. गॅस तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याचे नागरिक गॅस एजन्सीपुढे रांगा लावत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहेत. गॅस तुटवडा निर्माण झाल्याने आणि सिलेंडर मिळण्यासाठीच्या बुकिंगमध्ये कालावधी वाढवण्यात आल्याने परिस्थिती वेगळी झाली आहे. अशा परिस्थिती सरकारने गॅस तुटवडा नसल्याचा दावा केला आहे. Chhagan Bhujbal युद्ध अजून किती दिवस सुरू राहणार याबद्दल अजूनही निश्चित माहिती नाही. त्यामुळे पुढील काही दिवस गॅस तुटवडा भासू शकतो. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. Maharashtra minister Chhagan Bhujbal या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री ener”>छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे. सध्याची इंधन टंचाई लक्षात घेता सरकारने पुन्हा जुनाच पर्याय समोर आणला आहे. एलपीजीला पर्यायी इंधन देण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. पेट्रोल पंपावर केरोसीन वाटप करण्याबाबत सरकार चाचपणी करत असल्याचे सांगितले आहे. हेही वाचा : Salman Khan : सलमान खानच्या चित्रपटचे अचानक का बदललं? दिग्दर्शकाने केला खुलासा दरम्यान, युद्धाची मोठी झळ हॉटेल व्यावसायिकांना बसली आहे. अनेकांचे हॅाटेल बंद पडले आहेत. याचा परिणाम बाहेरगावहून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. काही ठिकाणी दरांमध्ये वाढ करण्यात येत आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे पर्याय म्हणून घरातही इंडक्श गॅस, विद्युत शेगडी, चूल असे अनेक पर्याय तसेच सौर ऊर्जेवरील काही साधनांचा वापर वाढला आहे. बुकिंगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच Chhagan Bhujbal गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केवळ ओटीपी (OTP) प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. हेही वाचा : Rajya Sabha Majority: राज्यसभेत भाजपची ताकद वाढली, पण बहुमतपासून दूर ; १३ जागा मिळाल्या तरी अजून ‘एवढ्या’ जागांची गरज